शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

राष्ट्रवादीकडून स्थलांतरित टार्गेट, भाजपचे ‘बंडखोर’ होताहेत मॅनेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 01:44 IST

मावळ लोकसभा निवडणूक : गाववाली मंडळी, नात्यागोत्यांना साद, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रभागनिहाय घरोघरी प्रचार, संघाची यंत्रणा सज्ज

हणमंत पाटील पिंपरी : पुणे व बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज मावळच्या निवडणुकीकडे वळली आहे. पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत बाहेरून नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना टार्गेट करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दोन दिवसांपासून येथे तळ ठोकला आहे. शिवाय महापालिका निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ राहण्यासाठी मॅनेज करणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राज्यातील तीन टप्प्यांतील निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे या भागातील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मर्जी राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात डेरेदाखल झाले आहेत. आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे काही नातेवाईक नोकरी व व्यवसायासाठी उद्योगनगरीत स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांच्या निवासाचे पत्ते घेऊन ही मंडळी पिंपरी, चिंचवड, थेरगाव, वाकड, निगडी, आकुर्डी या भागात आली आहेत. कोणताही गाजावाजा न करता आपल्या गाववाल्या मंडळींची बैठक घेऊन त्यांना मतदान करण्यासाठी अपील केले जात आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका २०१७ च्या निवडणूक काळात आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला. हे नगरसेवक भाजपाच्या तिकिटावरून निवडून आल्याने महापालिकेत सत्तापालट झाला. तीन नगरसेवक असलेला भाजपाने ७७ चा जादुई आकडा गाठत एकहाती सत्ता मिळविली. परंतु, दोन वर्षांतील महापालिकेचा कारभार पाहून मूळ राष्ट्रवादीतून भाजपाचे गेलेले नगरसेवक वैतागले आहेत. आता पुन्हा त्यांना राष्ट्रवादीचा कारभार बरा होतो, असे वाटू लागले आहे. आताच्या भाजपामध्ये ६० टक्के नगरसेवक मूळचे राष्ट्रवादी व काँग्रेसचे आहेत. या नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध व नातेगोते राष्ट्रवादीच्या काही पुण्यातील नेत्यांशी आहेत. ही नेते मंडळी आपल्या नातेवाइकांची समजूत करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ठाण मांडून आहेत. त्याला मतदार किती प्रतिसाद देतात, यावर निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत.

भाजपा व शिवसेना नेत्यांच्या दिलजमाईनंतर कार्यकर्त्यांच्या मनोमिलनास सुरुवात झाली. दरम्यान, भाजपा व आरपीआय या मित्रपक्षाने प्रभाग व वॉर्डनिहाय मतदारांशी संपर्क यंत्रणा सुरू ठेवली होती. त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व पुण्यातील नगरसेवक महाआघाडीच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र, महायुतीकडून बाहेरून फौज मागविण्याऐवजी स्थानिक नेते, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. महाआघाडी व महायुती या दोघांकडून मावळची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यासाठी जोरदार यंत्रणा राबविण्यात येत आहे. मात्र, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार यावरच श्रीरंग बारणे व पार्थ पवार यांचे भवितव्य ठरणार आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांची एकजूटमहायुतीची उमेदवारी जाहीर होईपर्यंत शिवसेना व भाजपामध्ये मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून तू तू मैं मैं सुरू होते. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश व मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे हे पारंपरिक वाद बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आले. त्यानंतर आमदार जगताप हे उमेदवारी अर्ज दाखल करताना, संकल्पनामा प्रकाशन, प्रचारफेरी व बैठकांना आवर्जून उपस्थित राहत आहेत.

महाआघाडीची फौज...शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, शरद रणपिसे, दिलीप सोपल, राहुल मोटे, राणा जगजितसिंह, भास्कर जाधव, वंदना चव्हाण अशी फौज मावळ लोकसभा मतदारसंघात आली.

महायुतीची फौज...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, गुलाबराव पाटील, रवींद्र मिर्लेकर अशी फौज मावळात येऊन गेली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळ