शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:37 IST

एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे,

अलिबाग : एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे, तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याआधी नागरिकांनी सलग दोन वेळा ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेले नाही. सध्या ग्रामपंचायतीवर गेली नऊ वर्षे प्रशासकामार्फतच कारभार केला जात आहे. कोळी समाजाच्या या निर्णयाचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना बसणारआहे.नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. २००७ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ११ पैकी आठ सदस्य कोळी समाजाचे निवडून आले होते; परंतु निवडून आलेल्या उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीवर ग्रामस्थांनीच बहिष्कार टाकला होता. त्यानंतर १ जानेवारी २०१२ रोजी अलिबाग तहसीलदार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायतीमध्ये हिंदू महादेव कोळी या जातीच्या समुदायाची संख्या अधिक आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जातीचे आरक्षण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आहे. हिंदू महादेव कोळी या जातीच्या दाखल्यांना जात समितीकडून वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. १९५० पूर्वीच्या कुटुंबातील व्यक्ती हयात नाहीत ज्या हयाच आहेत. त्या अशिक्षित असल्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे त्यांना सादर करता येत नाहीत, असे ग्रामस्थ फिडी कटोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोळी समाजाला सरकारकडून ठोस निर्णय मिळणार नाही तोपर्यंत पुढील सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर कायम बहिष्कार राहणार आहे. या निर्णयाचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे.दरम्यान, या आधी म्हसळा तालुक्यातील वाघाव बौद्धजन हितवर्धक मंडळाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.>जातीचे दाखले ग्राह्य धरण्याची मागणीहिंदू महादेव कोळी समाज येथे मोठ्या संख्येने असल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात येते; परंतु कोळी समाजापुढे जातीच्या दाखल्यांबाबत मोठी समस्या आहे. सर्वच लाकेप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासनच देत आहे, असेही कटोर यांनी स्पष्ट केले. कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास सर्वच समस्या सुटणार आहेत. त्याचप्रमाणे गावाचा विकासही होण्यास मदत मिळणार असल्याकडे ग्रामस्थ धनंजय कोळी यांनी लक्ष वेधले.कोळी समाजाकडे असलेले जातीचे दाखले, पुरावे ग्राह्य धरून जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारने आम्हाला जातीचे प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी केली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड