शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुंबईकरांच्या सोयीसाठी झाली मुरुडकरांची गैरसोय; चालक-वाहकांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:10 IST

एसटीच्या चालक, वाहकांना मुंबईत सेवा देण्यासाठी पाठविल्याने स्थानिकांची अडचण

मुरुड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यसाठी राज्य शासनाने मुंबई उपनगरांना जोडणारी रेल्वे सेवा बंद ठेवल्याने कामावर जाणाऱ्या असंख्य नोकदारांना एसटीद्वारे सेवा दिली जात आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून २५ ते ३० चालक, वाहक मुंबई आगारात समाविष्ठ करण्यात येऊन एसटीद्वारे मुंबईकरांची सोय केली जात आहे. याचा परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आगारातून चालक, वाहक मुंबईला गेल्याने गाड्या उपलब्ध असताना, आता प्रत्येक आगाराला चालक-वाहक उपलब्ध नसल्याने नियोजित गाड्या रद्द कराव्या लागत आहे. जिथे २४ फेऱ्या मारल्या जायच्या, तेथे आता फक्त दहा फेऱ्या होत आहेत. ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करण्यात आल्याने जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी दिवसाला तीन गाड्या सुटत असत, तेथे आता एखादी गाडी सोडण्यात येत आहे. 

मोठ्या प्रमाणात प्रत्येक आगारातील माणसे मुंबईला सेवा देण्यास गेली, परंतु ग्रामीण व तालुका स्थरावरील सेवा साफ कोलमडली आहे.मुंबईतून निघालेला माणूस अलिबागपर्यंत येतो व कित्येक तास खोळंबून राहतो. जोपर्यंत मुंबई गाडी येत नाही, तोपर्यंत त्याला आपले घर गाठता येत नाही. गाड्यांची संख्या कमी झाल्याने प्रवास खूप महागाचा पडत आहे.

नवीन भरती न केल्याने उपलब्ध कामगारांवर ताणएसटीने खूप वर्षांत नवीन भरती न केल्याने उपलब्ध कामगारांच्या जिवावर त्यांचा कारभार निर्भर आहे. उपलब्ध संख्या खूप कमी असल्याने त्यातच मुंबईला मोठ्या संख्येने माणसे रवाना झाल्याने स्थानिक पातळीवरची एसटी सुविधा ढासळलेली दिसून येत आहे. अनेक गाड्या रद्द, नेमक्याच गाड्यांमुळे वेळेवर न सुटणे, तासंतास वाट पाहावी लागणे हे चित्र सध्या सर्वच आगरात पाहावयास मिळत आहे. अशा अनेक त्रासांमुळे प्रवासी त्रस्त झाला आहे, परंतु सुधारणा होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने हा त्रास प्रवाशांना दीर्घकाळ सोसावा लागणार आहे. 

टॅग्स :state transportएसटी