शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा लागला छडा; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची स्तुत्य कामगिरी

By राजेश भोस्तेकर | Updated: March 18, 2024 14:51 IST

जयेशच्या हत्येप्रकरणी दोन जण ताब्यात

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : खालापूर तालुक्यातील रसायनी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या जयेश काशिनाथ खुडे या २७ वर्षीय तरुणाच्या खुनाचा छडा सहा वर्षांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला आहे. जयेश यांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी ओमकार सुनील शिंदे (२५) रां. वावंढळ, खालापूर आणि त्याचा साथीदार रोहित पाटील (२७) रा चांभार्ली या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. सहा वर्षापूर्वी झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी १८ मार्च रोजी अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनी संदीप पोमण उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात घडलेल्या काही खुनाच्या गुन्ह्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. अशा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशाने  स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक नेमले आहे. या पथकांच्या मार्फत उघड न झालेल्या खुनाचे गुन्ह्याचा तपास केला जात आहे. सपोनी संदीप पोमण यांच्या पथकाने रसायनी येथे सहा वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना उघडकीस आणला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. 

रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चावणे गाव ते पेट्रो नॉस रस्त्यावर १३ एप्रिल २०१८ साली रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञातांनी जयेश यांच्या अंगावर धारदार शस्त्राने अनेक वार करून मृतदेह नाळ्यामध्ये फेकून दिला होता. ही माहिती कळताच रसायनी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून ३०२ प्रमाणे अज्ञात मारेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास लागला नव्हता. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ओमकार शिंदे याला ३२६ अन्वये अटक ही झाली होती. मात्र खुनाच्या बाबतीत त्याचा सबंध आहे अशी तसूभरही कल्पना पोलिसांना नव्हती. त्यानंतर तो सुटून बिनधास्त वावरत होता.

उघड न झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना अखेर एका खबऱ्याच्या माहितीने स्थानिक गुन्हे विभागाचे सपोनी संदीप पोमण यांना २०१८ साली झालेल्या जयेश याच्या मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार सहा फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोह यशवंत झेमसे, पोह संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार ओमकार याला ताब्यात घेतले. पोलिसी इंगा दाखवल्यानंतर रोहित पाटील या आपल्या साथीदारांचे नाव घेतले. त्यालाही पथकाने कर्जत, जामखेड, अहमदनगर येथून ताब्यात घेतले. पैशाच्या वादातून खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

लिफ्ट देऊन त्याला संपवले

जयेश यांची हत्या का केली याची स्पष्ट कबुली आरोपींनी दिलेली नाही आहे. मात्र पैशाच्या वादातून खून केल्याचे आरोपी म्हणत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मयत याला मोटार सायकल वरून लिफ्ट देऊन घटनास्थळी आल्यानंतर त्याच्यावर हत्याराने वार करून संपवले होते. त्यानंतर दोघेही पळाले होते. यातील एकजण आरोपी हा रियल इस्टेट एजंट असून दुसरा सॉफ्ट वेअर इंजिनियर असल्याची पार्श्वभूमी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalibaugअलिबाग