शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पराभवाची नैतिक जबाबदारी पूर्णपणे माझी - सुरेश लाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:01 IST

कर्जत नगरपरिषदेच्या पराभवानंतर पत्रकार परिषद

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाला कर्जतकर मतदारांनी नाकारले. या निवडणुकीत क ार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले, तरीही आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता असल्याने हा पराभव मी मोकळ्या मनाने स्वीकारला असून हा पराभव का झाला? याचे कारण आताच सांगू शकत नाही. मात्र हे कसे घडले? याचा शोध घेऊन पुन्हा कामाला लागू. मी सत्तेत नसतानाही जनतेची कामे करत आलो आहे आणि करत राहणार आहे. कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.कर्जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस - महाराष्ट्र नवनिर्माण सेना - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष - शिवराय भीमराय विचार मंच या महाआघाडीचा शिवसेना - भारतीय जनता पक्ष - आरपीआय महायुतीने दारु ण पराभव केल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी भवनच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भगवान भोईर, जिल्हासरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव आदी उपस्थित होते.सुरेश लाड यांनी सुरुवातीलाच शिवसेना महायुतीच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पराभूत झालेल्या महाआघाडीच्या उमेदवारांनी पुन्हा कामाला लागून नागरिक व मतदारांचा विश्वास संपादन करावा असे सांगितले. तुम्ही उमेदवारांमध्ये जास्त लाड उभे केल्याने हा पराभव झाला काय? असे पत्रकारांनी विचारले असता लाड यांनी उत्तर देताना तशी शक्यता आहे असे सावध उत्तर देऊन लगेचच कोणतेही ठोस कारण सांगता येणार नाही. आज केवळ पराभव मान्य करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे स्पष्ट केले.मित्रपक्षांना सामावून न घेतल्याचा फटकातुमचे आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांना या निवडणुकीत सामील न केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले काय? या प्रश्नाला उत्तर देताना मी शेवटपर्यंत आमच्या या दोन्ही मित्र पक्षांना महाआघाडीत सामावून घेण्याच्या प्रयत्नात होतो. काँग्रेसने चारही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. शेतकरी कामगार पक्षाला प्रभाग सहामधील एक जागा देण्याचे निश्चित केले होते आमचा उमेदवार शेवटच्या मुदतीपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी उपस्थित होता, परंतु त्यांच्या एका उमेदवाराने प्रभाग दोनमधील माघार घेण्यास नकार दिल्याने नाईलाजाने आम्हाला तेथे आमच्या उमेदवाराला निवडणूक लढवावी लागली.

टॅग्स :Karjatकर्जतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा