मान्सून पर्यटन, ट्रेकिंगसाठी नोंदणी सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 04:04 AM2018-06-05T04:04:11+5:302018-06-05T04:04:11+5:30

पर्यटनासाठी गड-किल्ल्यांवर आलेले पर्यटक अनेकदा रस्ता न सापडल्याने जंगलात भरकटतात, तर काही जण डोंगर दऱ्यांची अचूक माहिती नसल्याने जीवास मुकतात.

 Monsoon tourism, registration for trekking is compulsory | मान्सून पर्यटन, ट्रेकिंगसाठी नोंदणी सक्तीची

मान्सून पर्यटन, ट्रेकिंगसाठी नोंदणी सक्तीची

Next

अलिबाग : पर्यटनासाठी गड-किल्ल्यांवर आलेले पर्यटक अनेकदा रस्ता न सापडल्याने जंगलात भरकटतात, तर काही जण डोंगर दऱ्यांची अचूक माहिती नसल्याने जीवास मुकतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात प्रबळगड, पेठकिल्ला, इर्शाळगड या गड-किल्ल्यांवर येणारे पर्यटक व ट्रेकर्सची नोंदणी वन विभागाकडून करण्यात येणार आहे. याशिवाय गडांवर जाणाºया ट्रेकर्संनी स्थानिक युवकांना गाइड म्हणून सोबत घेवून जावे, त्याचबरोबर ट्रेकिंगला जाण्यापूर्वी नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी अपघात होऊन पर्यटकांचे मृत्यू होणाºयांची संख्या गतवर्षी मोठी होती. ही जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली.
पर्यटकांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा, मद्यपान करून धबधब्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा ठिकाणी यंदा मद्यपानास बंदीही घालण्यात आली आहे. यावर्षी पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धबधब्याच्या ठिकाणी व परिसरामध्ये मद्य विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे धबधब्याच्या ठिकाणी तपासणी पथक कार्यरत राहील. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून बचाव साहित्य व सूचना फलक लावण्यात यावेत. होमगार्ड, संयुक्त वन व्यवस्थापन समिती जीवरक्षक नेमण्यात यावेत, अशा सूचना देखील सूर्यवंशी यांनी दिल्या असून पावसाळ्यातील पर्यटक मृत्यू रोखण्यासाठी या उपाययोजनेस सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title:  Monsoon tourism, registration for trekking is compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड