शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतमजुरांचा सामूहिक शेतीचा आदर्श, कोकणातील माणगावात उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 11:03 IST

शेतमजूर म्हटलं की स्थलांतर हे ओघानंच आलं. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपली गावं सोडून बाहेर जावंच लागतं.

राहुल रनाळकर

मुंबई : शेतमजूर म्हटलं की स्थलांतर हे ओघानंच आलं. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपली गावं सोडून बाहेर जावंच लागतं. या सगळ्यात मुलांच्या शाळा सुटतात; महिलांचेही अतोनात हाल होतात. तथापि, कोकणातील माणगावच्या शेतमजुरांनी सामूहिक शेतीचा मार्ग निवडत हे सक्तीचे स्थलांतर रोखले आहे. सध्या या शेतमजुरांच्या समूहावर संपूर्ण कोकणातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  इंदापूरपासून जवळ असलेल्या निवी मुठवली येथील आदिवासी वाडीवर हा प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. या आदिवासी शेतमजूर कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी मिळून सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. माणगाव येथील सर्वविकास दीप या संस्थेच्या माध्यमातून या आदिवासी शेतमजुरांना दिलेलं मार्गदर्शन सामूहिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं.

तीन वर्षांपासून माणगावमधील काही भूमिहीन शेतक-यांना वर्षभर रोजीरोटी मिळावी, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ज्या जमिनींवर साधारण नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत किंवा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत भात पिक घेतलं जातं, त्या जमिनी नंतर मेपर्यंत पिकाविना पडून असतात. अशा जमीन मालकांशी संस्थेच्या पुढाकारानं या शेतमजुरांच्या समूहानं करार केले. त्यानंतर डिसेंबर ते मेपर्यंतच्या काळात या जमिनीवर कारली, कलिंगड, भाज्या अशी उत्पादने घेण्यात आली. गेल्या वर्षी ४ टन कारली तर ३ टन कलिंगडांचे उत्पादन या शेतमजुरांनी घेतलं. संस्थेच्या माध्यमातूनच वाशीतील व्यापा-यांशी बोलणी करुन उत्पादीत झालेला हा माल मुंबईत आणण्यात आला. स्थानिक पातळीवर उपजिविका निर्माण झाल्याने या शेतमजूरांचे स्थलांतर थांबले. मुलांच्या शाळा नियमित राहिल्या; घरातील महिलांचीही ससेहोलपट थांबली. शिवाय संपूर्ण कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळू लागले.

रोहा कृषी महाविद्यालयातून मोफत बियाणे मिळवून देण्यात संस्थेला यश आलं. या आदिवासी शेतमजुरांच्या बचत गटाने गेल्या वर्षी तब्बल साडेसात ते आठ लाखांचा फायदा मिळविला. प्रत्येक कुटुंबाला साधारण ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेती करताना सेंद्रीय खतांचा अधिकाधिक वापर केला जातो. या बचतगटातील शेतमजुरांना बायो-कंपोस्ट खत वापरण्याचे तंत्र शिकविले जाते. सल्फेटसारखे कमी रसायने असलेले खत वापरण्यासाठीही संस्थेच्या माध्यमातून प्रवृत्त केले जाते. डिसेंबर ते मे या काळात बचत गटातील शेतमजूर हे पिकाचे मालक असतात, एकदा का पिक काढले गेले की ते पुन्हा पुढच्या हंगामासाठी भात शेतीसाठी काम करु लागतात.  सध्या बचतगटाच्या माध्यमातून १८ कुटुंबातील शेतमजूर १२ एकर शेतीवर हा सामूहिक शेतीचा प्रयोग करत आहेत.  कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्यसर्वविकास दीप संस्थेची २० सदस्यांची टीम आहे. दहा वर्षांपासून आम्ही माणगावमध्ये कार्यरत आहोत. आमच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या बचत गटातील प्रत्येक कुटुंबाला सध्या एक लाखाचे उत्पन्न मिळते. पण आम्ही एवढ्यावर नक्कीच समाधानी नाही. या कुटुंबांचे उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.  -रिची (भाऊ) माणगावकर, सर्वविकास दीप संस्था

 

टॅग्स :Farmerशेतकरी