शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 08:04 IST

मनसेच्या सहकार विभागाचे दाेनशे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे.

कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या तिसऱ्या वार्षिक सहकार परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कर्जत येथे येत आहेत. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी असे हे शिबिर होत आहे.  मनसेच्या सहकार विभागाचे दाेनशे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे.राज ठाकरे यांच्या संवादाने सहकार परिषदेचे उद्घाटन होणार आहेत. त्यानंतर ‘वित्तीय सहकारी संस्था’ या परिसंवादामध्ये महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचे मार्गदर्शन होणार आहे; तर सहकारी सेवा संस्था यांची नोंदणीपासून या संस्था कशा चालवाव्यात, या विषयावर मुंबई सहकार बोर्डाचे अध्यक्ष सुरेश म्हसे यांचे मार्गदर्शन होणार आहे.  पक्षबांधणी कौशल्य या विषयावर तसेच पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांचेदेखील मार्गदर्शन आणि ‘सहकार सेलचे पक्षबांधणीमधील योगदान’ या विषयावरही विचार मंथन होणार आहे.सहकार परिषदेचा समारोप माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर, पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, आमदार प्रमोद पाटील, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, जयप्रकाश बाविस्कर,  शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेKarjatकर्जत