शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात, एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:44 IST

दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

 - कमलाकर कांबळे नवी मुंबई : दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. २0२१पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य एमएमआरडीएने ठेवले आहे.सध्या मुंबई-नवी मुंबई या दोन शहरांना हमरस्त्याने जोडणारे वाशी-मानखुर्द आणि मुलुंड-ऐरोली हे दोन खाडीपूल आहेत. या दोन उड्डाणपुलांवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. भविष्यातील संभाव्य वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन दहा वर्षांपूर्वी तिसºया खाडीपुलाचा प्रस्ताव समोर आला होता. महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात या नवीन खाडीपुलाचा समावेश केला होता. राज्य सरकारनेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार या पुलाच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची नियुक्ती केली होती. एका खासगी एजन्सीमार्फत या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध स्तरावर पाहणी करून, हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार आता एमएमआरडीएने या नव्या खाडीपुलाच्या उभारणीसाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रस्तावित पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने बेल्जिएम येथील एन. पी. ब्रिजिंग या कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने अलीकडेच आपला अहवाल एमएमआरडीएला सादर केल्याची माहिती वरिष्ठ सूत्राने दिली.मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या दोन शहरांना जोडण्यासाठी सर्वप्रथम ठाणे खाडीपुलावर मानखुर्द-वाशी उड्डाणपूल उभारण्यात आला. शीव-पनवेल महामार्गावरील अत्यंत मोक्याच्या अशा या उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे-गोवा महामार्गावरील प्रवासही सोयीचा झाला. या पुलावरील वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, जुन्या पुलास लागूनच आणखी एक नवा पूल उभारण्यात आला. त्यापाठोपाठ मुलुंड-ऐरोली पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील मध्य उपनगरे नवी मुंबईच्या जवळ आली. अंधेरी ते बोरीवली यादरम्यान असलेल्या पश्चिम उपनगरांनाही पुणे-गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी ऐरोली-मुलुंड पुलाचा वापर सोयीचा ठरला आहे. या पुलामुळे पूर्व-द्रुतगती महामार्गही नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आला आहे; परंतु हे दोन्ही खाडीपूल वाहतूककोंडीच्या जंजाळात सापडले असून, भविष्याची मागणी लक्षात घेऊन विक्रोळी- कोपरखैरणे दरम्यान, सुमारे दहा कि.मी. लांबीचा नवीन पूल उभारणीच्या दृष्टीने कार्यवाही सुरू ेकेल्याची माहिती सूत्राने दिली.विक्र ोळी-घाटकोपर येथून वाशीला लागून असलेल्या कोपरखैरणे उपनगरात हा पूल प्रवेश करणार आहे. त्यानंतर पुढे तो ठाणे-बेलापूर मार्गाला जोडला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर वाशी खाडीपुलावरील हा तिसरा पूल उपयुक्त ठरणार आहे. घाटकोपर, पवई, विक्रोळी, कांजुरमार्ग आणि भांडुप या विभागातून नवी मुंबई, पनवेलकडे जलद प्रवास करण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे.पर्यावरण विभागाचा अडथळाही दूरमानखुर्द-वाशी आणि मुलुंड-ऐरोली या दोन खाडीपुलांना मधोमध असा हा पूल उभारला गेल्यास, त्यामुळे सागरी वाहतुकीचे काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली होती. त्यासाठी मेरिटाइम बोर्डाची विशेष परवानगी घेण्याचे सूचित करण्यात आले होते.तसेच खाडीपुलाच्या निर्मितीमुळे विक्रोळी आणि कोपरखैरणे या दोन्ही बाजूंकडील खारफुटीला धक्का लागणार आहे. यापैकी एमएमआरडीएला काही परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.