शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळ -उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांचाच पाठपुराव्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 17:52 IST

भाजपच्या जाहिरातीमुळे शिंदे गटातुन नाराजीचा सूर 

- मधुकर ठाकूर

उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याची जाहिरात करताना मात्र भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत आहे.या जाहिरातीत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा कुठेही साधा उल्लेखही नसल्याने मात्र शिंदे गटातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता प्रवासी वाहतूकीसाठी तयार झाला आहे. याच रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी लोकार्पण होणार असल्याच्या जाहिरातीचे फ्लॅक्स सार्वजनिक ठिकाणी लागले आहेत.भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत असल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.या जाहिरातीमध्ये शिंदे गटाचे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी केलेल्या कामाचा साधा उल्लेखही केला नाही.

पाठपुरावा, पत्रव्यवहार कुणी केला याची माहिती तर साऱ्यांनाच आहे.कुणी काय जाहिरात करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याची सावध प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. भाजपच्या कुटनितीबाबत मात्र शिंदे गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दिल्लीतील रेल्वे भवन, रेल्वे मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करून उरण- नेरुळ लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही जाहिरातीमध्ये खासदारांचा साधा उल्लेखही केला नसल्याने अतुल भगत यांनी खेदही व्यक्त केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना