शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:47 IST

चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात...

अलिबाग/महाड : ऐतिहासिक महाडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल. यासाठी लागणारा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी केली. 

चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे, आदी उपस्थित होते. 

अबू आझमी यांनी काढली इन्साफ यात्राचवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन कार्यक्रमाला पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी हजेरी लावली. त्यांनी मुंबई ते महाड अशी इन्साफ यात्रा काढली. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे, असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत असे स्पष्ट केले.  

लाखो अनुयायी उपस्थितसोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मान्यवरांनी क्रांतिस्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट देऊन अभिवादन केले. रायगड पाेलिस दलाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेली सात कोटींची विकासकामे सुरू आहेत. राजर्षी शाहू महाराज स्मारकाच्या तीन कोटींची कामे तातडीने सुरू केली जातील,  असेही शिरसाट यांनी सांगितले. मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले, चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्धापनदिनासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत कार्यक्रमाची निश्चिती करण्यात येईल.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाट