माणगाव : माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वार्ड क्रमांक १७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका नीलम राजेश मेहता यांची बिनविरोध निवड झाली. माणगाव नगरपंचायतीचे मावळते उपनगराध्यक्ष रत्नाकर बाळाराम उभारे यांनी ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर राजीनामा दिला होता. रिक्त पदाकरिता शुक्र वार, १० मार्च रोजी निवडणूक झाली. सकाळी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत राष्ट्रवादीच्या नीलम राजेश मेहता यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. दुपारी त्यांनी बिनविरोध निवड झाल्याचे ऊर्मिला पाटील यांनी जाहीर केले. (वार्ताहर)
माणगाव नगरपंचायत उपाध्यक्षपदी मेहता
By admin | Updated: March 12, 2017 02:20 IST