माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:48 AM2018-11-15T04:48:42+5:302018-11-15T04:49:22+5:30

सनियंत्रण समितीची शनिवारी बैठक: तक्रारींसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Meeting of Matheran Echo Sensitive Zone | माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनची बैठक

माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनची बैठक

Next

अलिबाग : माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन सनियंत्रण समितीची बैठक शनिवार दि. १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या क्षेत्रात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव, तसेच या समितीकडे करावयाच्या तक्र ारींसाठी नागरिकांनी आपले अर्ज या समितीचे सदस्य सचिव तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे तत्काळ सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकान्वये सेवानिवृत्त भा. प्र. से. अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ९ सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षांकरिता गठीत करण्यात आली असून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीची आठवी बैठक येत्या शनिवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वा. माथेरान नगरपरिषदेचे सभागृह, माथेरान, ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि. ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पूर्ण १व भागत: १९ अशी एकूण- २०,खालापूर तालुक्यातील भागत: १०,पनवेल तालुक्यातील पूर्ण २ व भागत: ३८ अशी एकूण- ४0,आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील भागत: १९अशा एकूण ८९ गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. वरील समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसीलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. या गावामधील जो भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, त्या क्षेत्रातील कोणतीही विकासकामे सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेखेरीज करता येणार नाहीत.

मान्यतेच्या दृष्टीने १० प्रतीत प्रस्ताव अपेक्षित

या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकासविषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नूतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्र ी. या कामांना सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या संदर्भात या समितीकडे कोणास काही तक्र ारी करावयाच्या असतील तर त्यांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे सुपूर्द करावेत. तसेच विकासकामांसाठी सनियंत्रण समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव १० प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती यांच्याकडे तत्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी
केले आहे.
 

Web Title: Meeting of Matheran Echo Sensitive Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.