शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

माथेरानमध्ये आता वनविभागाचाही हातोडा

By admin | Updated: February 15, 2017 04:53 IST

नगरपरिषदेनंतर आता वन विभागानेसुद्धा माथेरानच्या बेकायदा बांधकामाविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

माथेरान : नगरपरिषदेनंतर आता वन विभागानेसुद्धा माथेरानच्या बेकायदा बांधकामाविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी वन विभागाच्या जागेवरील बेकायदा बांधकाम हटविले. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या कारवायांमुळे माथेरानकर धास्तावले आहेत.बॉम्बे एन्वारमेंट अ‍ॅक्शन ग्रुपने हरित लवादामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वन विभागास हा आदेश दिला. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानचे वनपाल जी. पी. चव्हाण, नेरळचे वनपाल डी. ए. निरगुडे, दस्तुरी पार्किंगचे वनपाल पी. ए. खाडे, वनरक्षक आदींनी सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली. यावेळीमाथेरानमधील शार्लोट लेक, एको पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, लॅन्ड स्केप पॉइंट, हनिमून, लुईझा पॉइंटवरील बेकायदा स्टॉलधारकांवर कारवाई केली. सुरुवातीला दिलेली जागा मापून अतिरिक्त जागेवरील बांधकाम हटविण्यात आले. अशा वेगवेगळ्या खात्यांच्या कारवाईने माथेरानकर धास्तावले असून आम्ही माथेरानमध्ये राहायचे की नाही, असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर) माथेरानकरांचे शरद पवारांना साकडेमाथेरान : माथेरानकर आपलीच बांधकामे तोडण्यासाठी आलेल्या आसमानी संकटामुळे पुरते हैराण झाले आहेत. या संकटापासून मुक्ती मिळविण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे माथेरानकरांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये समक्ष भेट घेऊन माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर आलेल्या संकटाचा निपटारा करण्याचा माग काढण्याची विनंती के ली. यातून काहीतरी सुवर्णमध्य काढावा, यासाठी माथेरानमधील शिष्टमंडळाने सोमवार, १३ फे ब्रुवारीलाशरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. या वेळी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक दयानंद डोईफोडे, निसार मुजावर आदी उपस्थित होते. शासनाच्या विकास आराखड्याबाबतीत झालेल्या दिरंगाईमुळे स्थानिकांना नाहक मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.