शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ बाटल्यांपासून माथेरान नगर परिषदेस मिळतेय उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:02 IST

दरवेळी स्वच्छ सर्व्हेक्षण वेळीच माथेरानमधील कचºयाचे मोठया प्रमाणात संकलन करून

माथेरान : येथे पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्तत: पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात येथे सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती. मात्र आता नगरपरिषदेच्या कचरा वेचक महिला आणि सफाई कामगार हे नियमितपणे गावातील लॉजिंग तसेच हॉटेलमध्ये जाऊन सर्वच प्रकारचा कचरा संकलन करीत असतात. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात असून या यामाध्यमातून नगरपरिषदेस उत्पन्न मिळत आहे.

दरवेळी स्वच्छ सर्व्हेक्षण वेळीच माथेरानमधील कचºयाचे मोठया प्रमाणात संकलन करून डंपिंग ग्राऊंडवर नेला जायचा. तर अनेकदा अन्य भागातून येणाºया महिला हे प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या विक्रीसाठी नेत होत्या. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रभारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर या टाकाऊ बाटल्यांचा नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन म्हणून सदूपयोग होऊ शकतो ही संकल्पना मांडली; आणि नगरपरिषदेच्या कचरा वेचक महिला आणि सफाई कामगार हे नियमितपणे गावातील लॉजिंग तसेच हॉटेलमध्ये जाऊन सर्वच प्रकारचा कचरा संकलन करीत असतात. या प्लास्टिक बाटल्या मशीनमध्ये बेलिंग करून जवळपास एक हजार बाटल्या गोणीत भरून विक्रीसाठी भंगार कंपनीमध्ये नेत आहेत. चार महिन्यापासून या माध्यमातून तीस हजार रुपयांचे उत्पन्न नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे.स्वच्छते बरोबर येथे मोठया प्रमाणावर साठत असलेल्या सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केली जात आहे; यातूनच नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन मिळत आहे. त्यामुळे गावात स्वच्छता आणि प्लास्टिकपासून होणाºया प्रदूषणावर मात करता येईल.- प्रसाद सावंत, बांधकाम सभापती, नगरपरिषद 

टॅग्स :RaigadरायगडMatheranमाथेरान