शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जसनव्हा केमिकल कंपनीत गुरूवारी पहाटे भीषण स्फोट; २ जण ठार, ८ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 03:01 IST

Massive explosion at Chemical Company : स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की पाच किमी परिसरामध्ये तो ऐकायला आला. स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेले आणि खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

खोपोली : खालापूर तालुक्यातील साजगावजवळील आरकोस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या जसनव्हा केमिकल कंपनीत गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटामुळे परिसरातील चार ते पाच कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेमध्ये विष्णाई लुबाने (३५) या महिलेचा आणि अन्वर खान (४८) या दोघांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत.स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की पाच किमी परिसरामध्ये तो ऐकायला आला. स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेले आणि खिडक्यांच्या काचाही फुटल्या. दरम्यान, स्फोटामुळे लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतले होते. आठ ते दहा बंबांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर पाच ते सहा तासांनी आग आटोक्यात आली. घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विभागीय पोलीस अधीक्षक संजय शुक्ला, खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, अमोल वळसंग, श्रीरंग किसवे, प्रांत वैशाली परदेशी, तहसीलदार चपलवार, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.कंपनीत रिॲक्टरमध्ये काही तरी बिघाड झाला होता. पहाटे १.३० च्या सुमारास बॅचचे तापमान वाढायला लागले. रिॲक्टरही व्हायब्रेट व्हायला लागला होता. त्यामुळे कामगार तेथून बाहेर पडले. परंतु दुर्दैवाने बाजूलाच राहत असलेल्या कुटुंबातील विष्णाई लुबाने यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला  समोरच्या कंपनीतील अन्वर खान या वॉचमनच्या डोक्यावर शेडचा पत्रा पडल्यामुळे तोही यामध्ये मरण पावल्याची माहिती स्थानिकांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरांनी तातडीने परिसरामधील अन्य धोकादायक कंपन्यांचीही तपासणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली. 

बुधवारपासून स्थानिकांना त्रासबुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून परिसरातील लोकांना अमोनियाचा वास येत होता तसेच डोळे चुरचुरण्याचा त्रासही होत होता.  काही ग्रामस्थांनी याबाबत कंपनीकडे तक्रारही केली होती. आरकोस इंडस्ट्रियल इस्टेटच्या पदाधिकाऱ्यांनीही कारखान्याच्या मालकाला याबाबत कळविले होते.

टॅग्स :Raigadरायगडfireआग