शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

रायगडमध्ये युतीला आघाडीचे तगडे आव्हान; भवितव्यासाठी १६ जण रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 05:29 IST

शेतकरी कामगार पक्षाने युतीऐवजी आघाडीला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या रायगडमधील लढतीचे चित्र बदलले आहे.

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाने युतीऐवजी आघाडीला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या रायगडमधील लढतीचे चित्र बदलले आहे. प्रचाराची रणधुमाळी संपेपर्यंत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाल्याने युतीतर्फे लढत देणारे शिवसेनेचे अनंत गीते आणि आघाडीतर्फे रिंगणात असलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील लढत यावेळी प्रचंड चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.युती-आघाडीतील मातब्बर नेत्यांच्या प्रचारसभांनी गजबजलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी थंडावला. मंगळवारी, २३ ला येथे मतदान पार पडेल. त्यामुळे रायगडचा ‘राजा’ कोण? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने, गेले २० दिवस रायगड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. गीते हे हॅट्ट्रिक साधण्यासाठी, तर तटकरे हे मागील पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत. परंतु मतदारराजा नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो? हे निकालाअंती स्पष्ट होईल. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेरच्या दिवशी उमेदवारांच्या काही प्रमुख सभा वगळता काही ठिकाणी रॅली पार पडल्या आणि उन्हाच्या झळा सोसत सायंकाळी प्रचाराची सांगता झाली.छुप्या प्रचाराला वेग?नियमानुसार प्रचार थांबला असला, तरी आता खºया अर्थाने छुप्याप्रचाराला जोर येण्याची चिन्हे आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता बाहेर पडतील. मतदारांचे मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले कार्यकर्ते कामाला लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीते