शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मोलकरणींना अनेक घरांचे दरवाजे बंद; कुटुंब कसे चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:20 IST

पनवेल परिसरातील स्थिती : नुसते बसून राहण्याशिवाय पर्याय नाही

- अरुणकुमार मेहत्रेलोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : गत वर्षात कामागारांचे झालेले हाल, यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याची पुनरावृत्ती होत आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक घरांत काम करणाऱ्या स्त्रियांना काम करण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पनवेल परिसरात रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यामुळे काम करणाऱ्या स्त्रियांना कामावर येण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना काम शोधण्याची वेळ आली आहे. एका घरी काम करून महिन्याला हजार ते बाराशे रुपये मिळतात. एक मोलकरीण साधरणत: तीन- चार घरी काम करत असते. यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता काही घरांनी तूर्त काम बंद केल्याने घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.

घर कसे चालवायचे, याचीच चिंतावर्षभरापासून महागाईचा भडका उडत चालला आहे. घरसामान खरेदीसाठी पैसे जास्त मोजावे लागतात. कोरोनामुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कामावर जाता येत नसल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे. घर कसे चालवायचे, असा प्रश्न महिलासमोर उभा राहिला आहे. त्याचबरोबर आजारपण , लाइट बिल , पाणी बिल , अन्नधान्य खरेदीसाठी पैशाची चणचण भासत आहे.

एका घरातून मिळतात ७०० ते ९०० रुपये

अनेक घरी काम केले तरच चार पैसे मिळतात. गत वर्षी खूप उपासमार झाली. उसनवारी करत दिवस काढले. यंदा तरी चांगले दिवस येतील अशी आशा होती; पण पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने अनेक ठिकाणचे काम बंद झाले आहे. काय करावे सुचत नाही.    -इंदुमती पवार, मोलकरीण

सरकारने गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे; पण ते किती दिवस पुरणार. पनवेल येथे ऑफिसची साफसफाईचे काम करत होते ते बंद झाले आहे. आता एका घरी काम करते आहे. त्यातून ६०० रुपये मिळतात. त्यातून माझे घर कसे चालवणार, हा प्रश्न आहे.                   -नीला सरवदे, मोलकरीण

गेल्या तीन वर्षांपासून पाच घरी काम करत आहे. त्यातून चांगले पैसे मिळत असत; परंतु गतवर्षीपासून कोरोनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे दोनच घरी काम करते आहे. काय करणार यातून घर भागत नाही.    - प्रिया पवार, मोलकरीण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या