शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणवर हल्लाबोल; शहरातील बंदोबस्तात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:01 IST

लाखो नागरिक आज अधिकाऱ्यांना घालणार घेराव

अलिबाग : महावितरण कंपनीने वेळोवेळी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केल्याचा दावा करूनही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या मनातील खदखद दूर करण्यासाठी अलिबाग शिवसेना रस्त्यावर उतरून अलिबागमधील महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घालणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून महावितरणने दुरुस्तीच्या नावावर सहा-सहा तासांचे भारनियमन केले होते. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने महावितरणच्या कारभाराची लक्तरे उघडी पडली. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दुरुस्तीची कामे करूनही आठ-आठ तास वीज गायब होत असल्याने नागरिकांना भलताच मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण करूनही तारा तुटणे, पोल पडणे, विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, कंडक्टर तुटणे, डीपीमध्ये बिघाड होणे हे चक्र सातत्याने सुरूच आहे.अखंड वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असली तरी विजेचे बिल मात्र न चुकता आणि वेळेवर येत आहेत. दुपारी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विविध व्यावसायिकांचे चांगलेच हाल होत आहेत, तर रात्री वीज गायब होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांचेही हाल होत आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना अधिक सोसावा लागत आहे.वीज गेल्यावर महावितरणच्या तक्रार निवारण कक्षात फोेन केल्यावर तो लागत नाही आणि चुकून लागलाच तर समोरून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे नागरिकांचा पारा स्वाभाविकपणे वर चढतो. अधिकाºयांना फोन केला तर ते अनोळखी फोन उचलत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे वीजपुरवठा कशामुळे खंडित झाला आहे. तो कधी पूर्ववत होणार आहे याची काहीच माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे; परंतु प्रत्येक नागरिकांना महावितरणच्या कार्यालयावर धडक देता येणार नाही. हे गृहित धरून अलिबाग शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी सोमवारी अलिबाग येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देणार असल्याचे स्पष्ट केले.मोर्चामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विजय कवळे, कामगार नेते दीपक रानवडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. तसेच चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लढा देऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.अधिकाºयाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरेसातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आठ तासांचे भारनियमन करून दर मंगळवारी महावितरण दुरुस्तीची कामे हाती घेत असताना वीज जातेच कशी, असा सवाल राजा केणी यांनी उपस्थित केला आहे. अलिबाग-पेण तालुक्यातील सुमारे ६० हजार ग्राहकांसह रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील लाखो ग्राहकांना हा रोजचाच त्रास झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना महावितरण दाद लागू देत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या स्टाइलने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण