शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमानी कोकणात दाखल; मतदानासाठी गाठले गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 23:36 IST

Maharashtra Election 2019: कोकणातील मोठ्या संख्येने मतदार हा मुंबई आणि अन्य राज्यांमध्ये नोकरीनिमित्त जाऊन वसलेला आहे.

दासगाव : कोकणातील मोठ्या संख्येने मतदार हा मुंबई आणि अन्य राज्यांमध्ये नोकरीनिमित्त जाऊन वसलेला आहे. आजही नोकरी करत असला तरी त्याच्या गावच्या मतदानयादीमध्ये त्याचे नाव आहे. सोमवारी विधानसभेच्या मतदानासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच मतदारांनी मोठ्या संख्येने कोकणात येण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गजबजून गेला होता.

कोकणाच्या तळागाळापासन लाखोंच्या संख्येने नागरिक नोकरी तसेच व्यवसायानिमित्त मुंबई, गुजरात, पुणे तसेच अन्य राज्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. ज्याप्रमाणे सणाला सुट्टी असते त्या वेळी आपल्या गावी आवडीने हजेरी लावतात, त्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी म्हणजे ग्रामपंचायतीची असो, जिल्हा परिषद असो, खासदारकीची किंवा आमदारकी हे मतदार नागरिक मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या गावी येत असतात. निवडणुकीसाठी उभा राहिलेला उमेदवार हा मतदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. कारण या मतदारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक उभा राहिलेला उमेदवार निवडणुकीपूर्वीच या ठिकाणी जाऊन विभागा-विभागाच्या नागरिकांच्या मिटिंग घेऊन त्यांच्या येण्या-जाण्याची सोय अगोदरच करून ठेवतो. त्यामुळे मतदानाच्या वेळी हा मतदार मोठ्या संख्येने हक्क बजावण्यासाठी आपल्या गावी वेळेत हजर राहतो.

सोमवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई, गुजरात, पुणे व अन्य राज्यातून मोठ्या संख्येने मतदार कोकणात दाखल झाला. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासूनच मुुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला खासगी बसेसची गर्दी वाढली होती. ही वाहनांची गर्दी जवळपास सोमवारी दुपारपर्यंत दिसून आली. हजारोंच्या संख्येने बसेसच्या साहाय्याने मतदार हा कोकणात येत होता. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गजबजून गेला होता. या गर्दीमुळे बाहेर राहत असलेल्या मतदारांनी हक्क बजावण्यास काही कसर ठेवली नसल्याचे दिसून आलेअनेक मतदारांची नावे कोकणात तसेच नोकरी व व्यावसायानिमित्त गेलेल्या ठिकाणच्या मतदानयादीत असतात. सध्या एकाच वेळी सर्वत्र विधानसभेची निवडणूक होत असली तरी कोकणातील मतदारांनी गावीच हक्क बजावल्याचे दिसून आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान