शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Election 2019 : प्रचार करणे शिक्षकांना पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 2:29 AM

निवडणूक विभागाने तशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत येत आहे. प्रचार सभा, प्रचार रॅलींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. प्रचार यंत्रणा राबवताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच खासगी शाळेतील शिक्षकांचा सहभाग मागील निवडणुकीत दिसून आला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने कडक निर्बंध घालताना प्रचार रॅली अथवा सभांमध्ये शिक्षक आढळून आल्यास त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. निवडणूक विभागाने तशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रचारात शिक्षकांचा वापर करणाºया राजकीय पक्षाला सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.आत होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करणाºया शिक्षकांवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचीही नजर राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्था या कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. तसेच सरकारी शाळेतील शिक्षकांनाही सत्ताधाऱ्यांच्या आदेशामुळे निवडणुकीत काम करावे लागत आहे. त्यातीस काही शिक्षक हे मन लावून काम करतात तर काही शिक्षकांना राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा नाइलाजाने प्रचार करावा लागतहोता.जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा सुयोग्य वापर करण्याचे तंत्र येथील राजकीय पक्षांना चांगलेच अवगत झालेले आहे. बदली करण्याची, नोकरीवरून काढण्याची, अशा विविध दबावतंत्राचा वापर करून शिक्षकांना प्रचार करण्यास भाग पाडले जाते. मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध असल्याने त्यांना प्रचार कार्यात राबवले जाते. प्रचार रॅली, प्रचार सभा, प्रचाराचे व्यवस्थापन यासह अन्य कामासाठी त्यांना जुंपले जाते.राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवताना शिक्षकांना पाहिले आहे. अगदी प्रचारसभेसाठी खुर्च्या लावण्यापासून त्या उचलण्यापर्यंतची कामे काही शिक्षक करत आलेले आहेत. काही ठिकाणी तर मतदारांबरोबर संपर्क साधण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडलेली आहे. ही बाब आता निवडणूक विभागाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे प्रचारात शिक्षक दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवाराचा प्रचार करताना जे शिक्षक आढळतील त्या उमेदवारावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने तसे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांसह राजकीय पक्षांचेही धाबे दणाणले आहेत.निवडणूक विभागाच्या अशा कडक भूमिकेमुळे राजकीय पक्षांना आता मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे. शिक्षकांचा प्रचारात वापर करणाºया राजकीय पक्षांना आता आयत्या वेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातूनच प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही अशा शिक्षकांवर नजर राहणार असल्याने वादावादीचे प्रकार पुढे पाहायला मिळणार आहेत.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रचार सभा, बैठका, प्रचार रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येते. यासाठी कायमस्वरूपी पथक तैनात केलेले असते. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातात. चित्रीकरणात शिक्षक दिसल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे.राजकीय प्रचार सभा, प्रचार रॅली यासह अन्य कामाच्या फंदात शिक्षकांनी पडू नये. या उपरही कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत विविध शिक्षक संघटनांनी आपल्या सहकाºयांना राजकीय प्रचारात सहभाग घेण्याच्या कामापासून रोखावे.- विठ्ठल इनामदार,प्रांताधिकारी, महाड

टॅग्स :Raigadरायगडalibag-acअलिबाग