शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महाड न. प. महाराष्ट्रात आदर्श ठरेल - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 02:49 IST

दीडशे वर्षांच्या महाड नगरपरिषदेने केलेला शहराचा विकास या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा असाच असून, माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषद आपल्या कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

महाड : दीडशे वर्षांच्या महाड नगरपरिषदेने केलेला शहराचा विकास या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा असाच असून, माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषद आपल्या कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चून शिवाजी चौक परिसरात उभारण्यात येत असलेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी चव्हाण बोलत होते. या वेळी ९० लाख रुपये खर्चून उभारलेल्या अग्निशमन केंद्राच्या इमारतीचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री निसम खान, खा. हुसेन दलवाई, माजी आ. माणिक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.नगरपरिषदेने कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता, स्वत:च्या निधीतून या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेतले ही बाब कौतुकास्पद असल्याचे, अशोक चव्हाण यांनी सांगितले. नगरपरिषदेची ही भव्य वास्तू महाराष्ट्रात नंबर एक ठरेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. माणिक जगताप यांनी प्रास्ताविकपर भाषणात माजी मुख्यमंत्र्यांनी या इमारतीचे भूमिपूजन केले असले, तरी या इमारतीचे उद्घाटन काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, असे सांगताना दीड वर्षांत या इमारतीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही माणिक जगताप यांनी या वेळी दिली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण