शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 19:51 IST

Mahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे

आविष्कार देसाईलाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे, तर 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लेप्टोपायरोसिसचे 19, काेराेनाचे तीन, डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाड तालुक्यात महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाड आणि पाेलादपूर मध्ये अतिवृष्टीने पुर, दरडी काेसळल्या हाेत्या.  महाड-तळीये मध्ये दरड काेसळल्याने 84  नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पैकी 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले उर्वरीत 31 जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही 11 जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापुर आला. तब्बल 15 फुटाहून अधिक पाणी हाेते.महापुरात नागरिकांनी आपले प्राण वाचवले. आता महापुर आेसरला आहे. परंतू शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लवकर लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासना पुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.राेगराई पसरु नये यासाठी विविध ठिकाणची 18 वैद्यकीय पथक महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल 12 हजार 931 नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार 416 जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रार्दुभाव थांबलेला नाही. त्यामुळे 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.लॅप्टाेपायरसिसचे 19 रुग्ण सापडले आहेत, तर डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण सापडले आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.महाड, पाेलादपूरमध्ये साथ राेगांचा फैलाव हाेऊ नये यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार असा प्रश्न आहे. दरम्यान, हाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरु नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस