शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: भविष्यात अशी घटना घडणार नाही; महाड कोर्टाने घेतली नारायण राणेंकडून लेखी हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 00:26 IST

Narayan Rane: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देनारायण राणे यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूरभविष्यात अशी घटना घडणार नाही अशी न्यायालयाकडून लेखी हमीरायगड गुन्हे शाखेसमोर दोनदा हजेरी लावावी लागणार

महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायालयात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना महाड न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत. तसेच नारायण राणे यांचा व्हॉइस सॅम्पल घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (mahad court take undertaking from narayan rane about cm uddhav thackeray criticism case) 

नारायण राणे यांना मोठा दिलासा; महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर

महाड न्यायालयाने नारायण राणे यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने नारायण राणे यांच्याकडून लेखी हमी घेत काही अटी ठेवल्या आहेत. नारायण राणे यांनी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, अशा सूचना न्यायालायाने केल्या आहेत. याशिवाय, भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी लेखी हमी न्यायालायाने घेतल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त रायगड गुन्हे शाखेसमोर ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी हजेरी लावावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जवळपास तासभर न्यायालयाचे कामकाज चालले.

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

जवळपास तासभर न्यायालयाचे कामकाज

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. नारायण राणे यांचे विधान म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या घटनात्मक पदाची पायमल्ली करणारे आहेत. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असून, जबाबदार व्यक्तीने अशी विधाने करणे कितपत योग्य आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. तसेच ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावर, नारायण राणे यांच्यावतीने कुडाळ येथील वकील संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला. नारायण राणे यांना अटक करताना रितसर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नारायण राणे केंद्रीय मंत्री असून, त्यांच्याविरोधात चुकीची कलमे लावण्यात आली आहेत. तसेच अटक करण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. तसेच नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. दुपारी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचाही दाखला यावेळी न्यायालयाला देण्यात आला. अखेर पोलीस आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला.   

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाRaigadरायगडPoliticsराजकारणCourtन्यायालय