शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Mahad Building Collaspe: चार वर्षांचा मोहम्मद आई, बहिणींसाठी व्याकुळ; दुर्घटनेत बचावलेल्या चिमुरड्याची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:52 IST

महाड दुर्घटनेतील ते कुटुंब मंडणगड तालुक्यातील

मंडणगड : इमारत कोसळली अन् त्याची आई, दोन बहिणी यांचा मृत्यू झाला. तोही तेथेच होता. तब्बल १९ तास मातीच्या ढिगाऱ्याखाली राहूनही तो बचावला. पण आज तो व्याकुळ आहे आपल्या आईला व बहिणींना पाहण्यासाठी. त्या आहेत कुठे, त्या दिसत का नाहीत, असे प्रश्न त्याला पडत आहेत आणि त्याची उत्तरे कोणाकडेच नाहीत. महाडच्या इमारत दुर्घटनेत बचावलेल्या मोहम्मद बांगी या चार वर्षांच्या चिमुरड्याची ही कथा.

महाडमधील इमारत दुर्घटनेत मोहम्मदची आई नौशिन बांगी, त्यांची सहा वर्षाची मुलगी आयशा, दोन वर्षाची रूकिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे बांगी कुटुंब मूळचे मंडणगड तालुक्यातील वेसवी या गावचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून ते महाडमध्ये वास्तव्यास आहेत. मोहम्मदचे वडील नदिम बांगी नोकरीसाठी परदेशात असतात. नौशिन यांची बहीण शाहीन परकार आणि त्यांची तीन मुले हेही त्यांच्यासोबत राहतात. ईद झाल्यावर नौशिन आपल्या तीनही मुलांसोबत महाडला गेल्या. मंगळवारी एक नातेवाईक परदेशी जाणार होते. त्यांच्यासोबत पतीला काही खाणे देण्यासाठी नौशिन काम करत होत्या आणि त्याचवेळी त्यांची इमारत कोसळली. नौशिन, आयशा आणि रूकिया या तिघींचाही त्यात मृत्यू झाला. चार वर्षांचा मोहम्मद मात्र त्यात बचावला. १९ तास तो मातीच्या ढिगाºयाखाली राहिला होता आणि तरीही तो बचावला.मोहम्मदचे वडील परदेशातून परत आले असून, वेसवी येथे नौशिन, आयशा, रूकिया यांच्यावर गावीच अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहम्मदच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला सहा टाके पडले आहेत.गाडी न मिळाल्याने परकार कुटुंब बचावलेमंडणगड तालुक्यातील पेवे गावातील रहिवासी आणि नौशिन यांची बहीण शाहिन परकार यांचे कुंटुंबही त्याच इमारतीत होते. ईदसाठी ते सर्व गावी आले होते. सोमवारी ते महाडला परत जाणार होते. मात्र काही कामानिमित्त घरातील गाडी उपलब्ध नसल्याने त्या सोमवारी महाडला जाऊ शकल्या नाहीत. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे प्राण वाचले.‘आरोपी लवकरच सापडतील’तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दोषींपैकी एकाला रायगड पोलिसांनी २६ आॅगस्ट रोजी अटक केली. तर अन्य चार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. लवकरच विकासकासह अन्य आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना