शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Mahad Building Collapse: विस्फारलेल्या डोळ्यांच्या पाणावल्या कडा; परिसरातील नागरिकांची धावाधाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 23:46 IST

महाड शहरातील इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढण्याचे काम सुरूच

२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते...तर कानठळ्या बसणाºया स्फोटाप्रमाणे आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची धावाधाव सुरू झाली...प्रत्यक्ष घराबाहेर पडल्यानंतर कानी पडला तो फक्त...आक्रोश...काळीज धस्स करणारे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळे विस्फारून पाणावले...भेदरलेल्या नागरिकांना काही काळ काही सूचलेच नाही...दासगाव : महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही इमारत सोमवारी सायंकाळी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. इमारत कोसळत असतानाच काही जण सुखरूप बाहेर पडले. मात्र, अनेक जण मातीखाली अडकले गेले.

तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. या ठिकाणी राहत असलेले बशीर चिचकर यातून सुखरूप बाहेर पडले. इमारत भूकंप आल्यानंतर ज्याप्रमाणे हलते तशी हलू लागली आणि आम्ही बाहेर पडू लागलो, असे चिचकर यांनी सांगितले. बाहेर पडताना चिचकर यांचा पुतण्या आवेश आणि इतर तरुणांनी सुरुवातीला २० जणांना बाहेर काढले आणि इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीमधील ८० जण बचावले असून, १४ मृतदेह काढण्यात आले आहेत. मदत कार्याला वेग आला असून, इमारतीचा पडलेला भराव काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपले नातेवाईक सुखरूप असावी आशा आशेने त्यांचे नातेवाइक घटनास्थळीच बसले आहेत. एनडीआरएफ टीम, पोलीस, प्रशासनाला परिसरातील नागरिक मदत करत आहेत. तर ज्यांच्या नातेवाइकांचा मृत्यू झालात्यांचे सांत्वन करत आहेत. या संकट प्रसंगी मााणुसकी टिकू न असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, महाड ट्रामा केअरचे अधीक्षक डॉ.भास्कर जगताप आदी वैद्यकीय अधिकारी दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी पराकाष्ठाकरत आहेत.अयुब यांनी वाचविले १५ ते २० जणांचे प्राणयाच इमारतीत पाचव्या मजल्यावर राहणाºया अयुब चिचकर यांनी आपल्या पत्नीसह तीन मुलांचे प्राण वाचवलेच, शिवाय इमारत कोसळत असल्याचे लक्षात येतात त्यांनी या इमारतीमधील सुमारे पंधरा ते वीस रहिवाशांनाही फ्लॅटबाहेर जबरदस्तीने काढून सुरक्षित ठिकाणी आणून सोडले. स्वत:चा जीव धोक्यात घालून अयुब चिचकर यांच्यासह परिसरातील अनेक तरुणांनीही या इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. जिन्यावरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण इमारतच जमीनदोस्त झाली आणि जिन्यातच या सर्वांवर अखेर काळाने झडप घातली.१८ तासांनंतर सापडला पहिला मृतदेहसोमवारी संध्याकाळी महाडमध्ये काजलपुरा या ठिकाणी तारिक गार्डन ही पाचमजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर, प्रशासन खडबडून जागे झाले आणि सर्व शासकीय यंत्रणा मदत कामसाठी लावण्यात आली. दुर्घटनेमध्ये अनेक लोक बचावले, तर अनेक जण ढिगाºयाखाली गाडले गेली. तब्बल १८ तासांनंतर ढिगाºयाखालून एक शव काढण्यास यंत्रणेला यश आले. नाविक जावेद जोमाने (३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नाविक जोमाने याचे इमारतीत कार्यालय होते. दुपारी ते कार्यालयात झोपला होता. त्यानंतर, हीघटना घडली. १८ तासांनंतर त्याचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. नाविक याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी तारिक गार्डन या इमारतीची जी दुर्घटना घडली आहे, त्या इमारतीमध्ये दोन भाग होते, तर ४१ फ्लॅट आणि एक जीम आणि एक आॅफिस होते, तर या इमारतीमध्ये ९७ लोक राहत होती. इमारत दुर्घटना झाली, त्यावेळी इमारतीमधून ८० लोक बाहेर पडले, तर १७ लोक या इमारतीच्या ढिगाºयाखाली अडकले. इमारत कोसळल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावली आणि एनडीआरएफला पाचारण केले.नातवाच्या हाके साठीआतुरअलिबाग : नातू धावत येऊन ‘नाना’ म्हणून हाक मारीत येतील, या आशेने आजोबांचे डोळे तारिक गार्डन इमारतीच्या ढिगाºयाकडे लागले होते. महंमद अली वुकेय यांची ही करुण कहाणी आहे. महंमद अली यांची मुलगी आणि दोन नाती, एक नातू हे तारिक गार्डन इमारती दुर्घटनेत ढिगाºयाखाली अडकले होते. महाड शहरातील काजळपुरा या परिसरात तारिक गार्डन इमारतीत महंमद अली यांची कन्या नवशीन बांगी ही ए विंगमध्ये आपल्या तीन मुलांसह आयशा बांगी (६), महंमद बांगी (४), रु कय्या बांगी (२) तिसºया मजल्यावर राहत होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच महंमद अली मंडणगड पंदेरी येथून महाडला आले. महंमद अली हेही नवशीन बांगी यांच्याकडे राहत होते. मात्र, लॉकडाऊन असल्याने ते मंडणगड पंदेरी येथे आपल्या गावी राहत होते. दुर्घटनेची माहिती कळताच महंमद अली हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच समोरचे दृश्य पाहून अली हे थबकले.सायंकाळी व्यायाम करून आल्यानंतर मी स्वयंपाक घरात बसलो होतो. त्यावेळी फ्रीज काहीसा खाली खचल्याचे दिसले. क्षणाचाही विलंब न लावता, मी माझ्या कुटुंबाला सोबत घेऊन पाचव्या मजल्यावरून ओरडत जमेल तेवढ्यांंना घेऊन खाली आलो. तळमजल्यावर आल्यावर इमारतीचा पिलर तुटत असल्याचे दिसले. त्यानंतर, लगेचच दुसरा पिलर तुटण्यास सुरुवात झाली. तेव्हा आम्ही तातडीने दुसºया इमारतीकडे धाव घेतली. त्यानंतर, काही क्षणांतच इमारत जमीनदोस्त झाली. काही सेकंदाचा फरक पडला असता, तर आम्हीही त्या इमारती खाली गेलो असतो. प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. -जावेद चिचकर, बचावलेला रहिवासीमाझा भाऊ त्या इमारतीमध्ये राहत होता. माझे घर सुमारे ५०० मीटरवर आहे. १४ आॅगस्टच्या सायंकाळी धुराचे लोट उठले. मी कमालीचा घाबरलो. कारण माझा भाऊ राहतो, तेथून धुरळा उडत होता. मला फोन आला की, तारिक गार्डन इमारत कोसळली. माझे हातपाय थरथर कापत होते. त्याच वेळी माझ्या भावाचा फोन आला, आम्ही सुखरूप आहोत. जीव भांड्यात पडला खरा, परंतु अन्य नागरिक अडकल्याने खूप दुख: वाटत आहे. - बशीर चिचकर, प्रत्यक्षदर्शीइमारत कोसळण्याच्या सुमारास मी घराबाहेर होतो. घरी असलेल्या माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले की, भूकंप होतो आहे. मी त्याला म्हणालो, नाही बेटा, भूकंप वगैरे काही होत नाही, परंतु त्याने माझे ऐकले नाही. तो आपल्या आईला म्हणजे माझ्या पत्नीला सोबत घेत इमारतीबाहेर आला. त्यानंतर, काही क्षणांमध्येच संपूर्ण इमारत कोसळली. नशीब माझ्या मुलाने माझे ऐकले नाही, म्हणून अनर्थ टळला. -एक रहिवासीतारिक गार्डन इमारतीचे बांधकाम निकृष्टमहाड : तारिक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबंधित बिल्डरकडे करीत होते. मात्र, नगरपरिषदेत तक्रारी करू नका. मी दुरुस्ती करून देतो, अशी बोळवण या बिल्डरकडून केली जात होती, अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली. दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्किंगमधील एक पिलर ढासळल्याची तक्रार या इमारतीच्या रहिवाशांनी बिल्डरकडे के ली होती. ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र, मी प्लास्टर करून देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्यांची पुन्हा बोळवण केली. त्यानंतर, केवळ सात-आठ तासांतच ही इमारत पूर्ण कोसळली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाRaigadरायगड