शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात किराणा दुकानदारांकडून लूट, चढ्या दरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:45 IST

रोजचा स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, कडधान्ये, डाळी, मसाले, तेल, भाजीपाला, चढ्या दरात विक्री करत आहेत. अवाच्या सव्वा रक्कम घेत असल्याने ग्राहक संतापले आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागात ही किरकोळ किराणा दुकानदार, व्यापारी मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ करून ग्राहकांना लुटत आहेत. रोजचा स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, कडधान्ये, डाळी, मसाले, तेल, भाजीपाला, चढ्या दरात विक्री करत आहेत. अवाच्या सव्वा रक्कम घेत असल्याने ग्राहक संतापले आहेत.वर्षानुवर्षे याच सर्वसामान्य ग्राहकराजाच्या जीवावर आपला व्यवसाय करून संपत्ती कमावलेल्या दुकानदार, व्यापारी या संकटसमयी ग्राहकांची लूट करताना दिसत आहेत, सरकारच्या सूचनांना धाब्यावर बसवून चढ्या दराने मालाची विक्री करत आहेत. ‘परवडत असेल तर घ्या... नाही तर घरी जा...’ असे शब्दही ग्राहकांना ऐकावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येते. नाइलाजाने पोटाची भूक भागवण्याकरता चार वस्तूंसाठी आणलेल्या पैशात एक- दोन वस्तू घेऊन घरी परतावे लागत आहे .कर्जत तालुक्यात अनेक सेवाभावी संस्थांनी, दानशूरांनी आपापल्या परीने तालुक्यातील आदिवासी भागात मदत पोहोचवली आहे. मात्र इतर समाजातील सर्वसामान्य लोकांना गरज असूनही केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी हे लोक मदत स्वीकारायला पुढे येत नाहीत म्हणा किंवा मदत करणाºयाचा कल आदिवासी समाज बांधवांकडे जास्त दिसून येतो. त्यामुळे इतर मध्यमवर्गीय लोकांना मदतीची गरज असल्याचे जाणवते.>सामान्यांची कोंडीतालुक्यातील ग्रामीण भागात दुकानदारांकडून किराणा सामानाचे भाव अवाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत, परिणामी सर्वसामन्यांची या लॉकडाउनच्या काळात कोंडी होत आहे. या संकटाच्या वेळी ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस