शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

Lok Sabha Election 2019 : नियम भंग करणाऱ्या प्रिंटर्सला सहा महिन्यांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 14:15 IST

उमेदवार, मुद्रणालयांच्या चालक मालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

ठळक मुद्दे सर्व संबंधितांनी या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे कार्यात कायदेशीर तरतूदीचे पालन करुन  निवडणूक कामाला सहकार्य करावे असे आवाहन रायगडचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.यांच्याकडे सर्व राजकीय पक्षाचे,  निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात आले.

जयंत धुळप

अलिबाग  - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधितांनी या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे कार्यात कायदेशीर तरतूदीचे पालन करुन  निवडणूक कामाला सहकार्य करावे असे आवाहन रायगडचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यास सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दोन हजार रुपयापर्यत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल.त्यामुळे राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांच्या चालक मालकांनी यांची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127-अ आणि त्याव्दारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिध्दीवर घालण्यात आलेले निर्बंध घालण्यात आले आहेत. यांच्याकडे सर्व राजकीय पक्षाचे,  निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात आले.

उक्त कलमान्वये प्रथम असे विहीत करण्यात आले आहे की, हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र , हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भिंतीपत्रक यांच्या दर्शनी भागावर  मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नांव व पत्ता प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. असा कोणताही पत्रक मुद्रकांने इच्छुक प्रकाशकाकडून  त्यांनी  स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे, त्या व्यक्तिला व्यक्तिश: ओळखतील अशा  दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या  त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रतीमध्ये) घेणे अत्यावश्यक केले आहे.

दस्तऐवज  छापण्यात आल्यावर तसेच मुद्रकांने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक इत्यादींच्या चार प्रती ते पत्रक इत्यादीच्या चार प्रती ते पत्रक राज्याच्या राजधानीवर ठिकाणी  छापण्यात आले असेल तर मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांकडे आणि इतर कोणत्याही प्रकरणी दस्ताऐवज जेथे छापण्यात आले असेल त्या जिल्हयाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे 3 दिवसाचे आत सादर करण्यात यावे. त्यासोबत छपाई केलेल्या पत्रकासाठी  किती  मोबदला घेतला याबाबत ठराविक प्रपत्रात  माहिती देण्यात यावी.

टॅग्स :Electionनिवडणूकalibaugअलिबाग