शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Lockdown in Raigad : रायगड जिल्ह्यात तीस नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 00:43 IST

Lockdown in Raigad district till November 30 : या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

अलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी कुठेही एकत्र येऊन समारंभ वा उत्सव साजरा करू नये, म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हाभरात कलम १४४ नुसार सुधारित प्रतिबंधात्मक आदेश मंगळवार, ३ नोव्हेंबरमध्ये जारी केले आहेत.शासनाकडून नव्याने लॉकडाऊन कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवून सुधारित आदेशान्वये (Easing of Restrictions & Phasewise opening of lockdown. - MISSION BEGIN AGAIN) लागू केलेले निर्बंध, तसेच सुरू करण्यास मान्यता दिलेल्या बाबी यापुढे ही सुरू राहतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४च्या तरतुदीनुसार रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात दि. ३१ ऑक्टोबर, २०२० रोजी रात्री १२ वा. पासून ते ३० नोव्हेंबर रात्री १२वा.पर्यंत नव्याने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.या अधिसूचनेद्वारे दिलेल्या अथवा यानंतर वेळोवळी पारीत केल्या जाणाऱ्या आदेशानुसार प्रतिबंधित केलेली अथवा केली जाणारी कृत्ये करण्यास मनाई राहील, असेही आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे आहेत आदेशहे आदेश पोलीस, आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. 

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस