शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:29 IST

कारागिरांना फटका : सरकारच्या मूर्तींची उंची कमीच्या आदेशामुळे संभ्रम

निखिल म्हात्रे।अलिबाग : मागील वर्षी जिल्ह्यातील झालेली पूर परिस्थिती आणि या वर्षी कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदारांच्या अर्थकरण बदलवून टाकले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा देत, मूर्तींची उंची कमी करून घेतली आहे. गणेशमूर्तींच्या कच्च्या मालासाठी खर्च झालेले पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांची आता अर्थिक गणिते बिघडलेली आहेत.

मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे जानेवारीतच सुरू होते. सुरु वातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात. होळी झाल्यानंतर गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले. कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडऊन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले पाच महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरू झाले. मात्र, गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरू होणार, तेवढ्यातच लॉकडाऊन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नाही. त्यातच यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तिकार चिंतेत पडले आहेत.यंदा कोरोनामुळे शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फुटांची मूर्ती, तर घरगुती गणेशमूर्ती ही २ फुटांची असावी, असे आदेश काढल्यावर सगळेच संभ्रमात आहेत.यंदा एकही आॅर्डर नाही- सागर हजारेच्दरवर्षी आमच्या कारखान्यात १० ते ११ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र, यंदा केवळ २ हजार गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही, आॅर्डरही नाही. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. आमच्या मूर्तिशाळेत दरवर्षी २००० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र, एकही आॅर्डर नाही, असे हमरापूर येथील कारखानदारसागर हजारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.च्मोठे मूर्तिकार हे जानेवारीपासून मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, छोटे मूर्तिकार हे वीटभट्टीचे काम संपले की, हे काम सुरू करतात. मात्र, त्यांचे मूर्ती घडविण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरु वात झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत सारख्या आलेल्या आपत्तीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. सरकारने गणपती कारखानदारांसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीRaigadरायगड