शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण, ठोस निर्णयाविना माघार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:53 IST

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांनी आंदोलन केले आहे. 

मधुकर ठाकूर

उरण (रायगड) :  सिडकोने दिघोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १८ नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा राजिपचे माजी सदस्य डॉ. मनिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिघोडे येथील रहिवाशांनी उरण तहसील कार्यालयासमोरच सोमवारपासून (१९) उपोषण सुरू केले आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी दिड मिटर व्यासाची जलवाहिनी १७ डिसेंबर २०२० रोजी दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत फुटली होती. 

सदर मोठ्या प्रमाणावर फुटलेल्या जलवाहिनीमुळे परिसरातील १८ रहिवाशांच्या राहत्या घरांचे व व्यावसायिकांच्या दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. तसेच रस्त्यावरील काही वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी रहिवाशांनी सदर पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम रोखले होते. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी १८ नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण होताच दिलेल्या आश्वासनाकडे कानाडोळा करीत सिडको व्यवस्थापनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सातत्याने सुरू करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतरही आजतागायत सिडकोकडून रहिवाशांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. 

सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषणत्यामुळे सिडकोच्या बनवाबनवीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी उरण तहसील कार्यालयासमोरच सोमवारपासून (१९) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा चिटणीस किरीट पाटील, माजी नगरसेवक महेंद्र कांबळे, भालचंद्र घरत, विनोद पाटील, महेंद्र ठाकूर, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, अल्पसंख्याक तालुकाअध्यक्ष शाकीर कादीर शेख, निर्मला पाटील, बी.एम.ठाकूर, माजी नगरसेविका अफशा मुकरी, गणेश पाटील, माजी सरपंच किर्तीनिधी ठाकूर, माजी उपसरपंच प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह अनेकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.

आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम दरम्यान, सिडकोने नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या सूचना उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिल्या आहेत. तर सिडकोच्या वरिष्ठ व्यवस्थापक अधिकाऱ्यांकडे नुकसानग्रस्तांच्या आर्थिक भरपाई देण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई देण्यात येणार असल्याचे मोघम आश्वासन सिडको अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. मात्र त्यावर उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यापदरातही काही पडलेले नसल्याने आंदोलन मागे अद्याप तरी मागे घेण्यात आले नसल्याची माहिती उपोषणकर्ते डॉ.मनिष पाटील यांनी दिली. 

 

टॅग्स :Raigadरायगडcidcoसिडको