शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:08 IST

वाकण ते पाली फाटा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे

पाली : वाकण ते पाली फाटा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या मोऱ्यांसाठी मोठे पाइप टाकण्यात आले आहेत. मात्र जुन्या रस्त्याला असलेल्या लहान मोºया पाण्याचा जोरदार प्रवाह सहन न करू शकल्याने जुने पाइप पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आजूबाजूचा रस्ता खचून भगदाड पडले आहे. पालीचे तहसीलदार बाबूराव निंबाळकर आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र रस्ता खचून चार तास उलटले तरी एमएसआरडीचे अधिकारी आणि कंत्राटदार पाहणीसाठी आले नाहीत.रस्ता वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडल्याने वाहनांची रांग लागली होती. रस्त्यातील माती आणि पाइप काढण्याचे काम सुरू केले असून पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ता वाहून गेल्याने मोरीचे काम करण्यासाठी वेळ लागू शकतो.पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक व जीवघेणा बनला आहे. एमएसआरडीसीच्या गलथान कारभाराविरोधात लोकशाही व सनदशीर मार्गाने सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी रस्ता वाहतुकीला व्यवस्थित करून देऊ असे आश्वासन एम.एस.आर.डी.सी.एल.चे अधीक्षक अभियंता कर्नल रवींद्र घोडके, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, डेप्युटी इंजिनिअर सचिन निफाडे यांनी दिले होते. या घटनेला चार दिवस होत नाही, तोपर्यंत रस्ता वाहून गेला आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असताना खोदकामात रस्ता खचत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पावसाची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९८.४९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस अलिबाग १५५.०० मि.मी., पेण-१६०.०० मि.मी., मुरु ड-६०.०० मि.मी., पनवेल-१५८.५० मि.मी., उरण-१०६.०० मि.मी., कर्जत-८६.३० मि.मी., खालापूर-७१ मि.मी., माणगाव-७० मि.मी., रोहा-११० मि.मी., सुधागड-७७ मि.मी., तळा-१३० मि.मी., महाड-३८ मि.मी., पोलादपूर-५०, म्हसळा-१०५ मि.मी., श्रीवर्धन-४४ मि.मी., माथेरान-१५५ मि.मी. नोंदविण्यात आला आहे.मोहोपाडा : रसायनीसह इतर भागात रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाला सुरु वात होताच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याच्या वाºयामुळे पावसाने रविवार रात्रीपासून सोमवारी पूर्ण दिवस चांगलेच झोडपून काढले. यावेळी दांड-रसायनी रस्त्यावरील काही झाडे उन्मळून पडली, तर मोहोपाडा बाजारपेठेत काही ठिकाणी रस्त्याशेजारील दुकानांचे नामफलक कोसळले. सोमवारी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. रसायनी पाताळगंगा परिसराच्या मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू असणाºया मोहोपाडा बाजारपेठेत सोमवारी पूर्ण दिवस शुकशुकाट जाणवला.वेळास-आदगाव रस्ता खचतोयदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव मार्गावरील मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आहे. याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये नाराजी आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन दृष्टिकोनातून प्रमुख समुद्रकिनारे आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कोंडविल या किनाºयांबरोबरच वेळास व आदगाव समुद्रकिनाराही पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. मात्र वेळास-आदगाव मार्ग खड्डेमय झाला असून रस्त्याला आणखी मोठे भगदाड पडण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.विरेश्वर उद्यानाची सुरक्षा भिंत कोसळलीखोपोली : वरची खोपोली येथे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या विरेश्वर उद्यानाची भिंत उद्घाटनापूर्वीच कोसळल्यामुळे उद्यानाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळली. सलग दोन विधानपरिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे उद्यानाचे उद्घाटन लांबणीवर पडले, अन्यथा मे महिन्यामध्येच या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. जर उद्घाटन झाले असते तर निकृष्ट बांधकामामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. स्थानिक नगरसेविका माधवी रिठे व जिनी सॅम्युअल यांनी नगरपरिषद सभागृहात वेळोवेळी विरेश्वर उद्यान व महावीर उद्यानाच्या कामाबाबत होत असलेली दिरंगाई व कामाचा दर्जा याबाबत आवाज उठवला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी उद्घाटनापूर्वीच उद्यानाची भिंत कोसळली.