शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा नद्यांनी गाठली धोक्याची पातळी, सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:45 IST

शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. धुंवाधार पाऊस आणि भरतीमुळे नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदी आणि खाडीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नेहमी ७ जूनला बरसणा-या पावसाचे २७ जून रोजी उशिराने आगमन झाल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले होते, तर दुसरीकडे बळीराजाही पावासाच्या प्रतीक्षेत होता. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने पावसाला सुरुवात होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील राब पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला होता.२७ जूनपासून पावसाने पुन्हा दमदार कमबॅक केले. त्या दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सातत्याने पडणाºया पावसामुळे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी नद्यांही दुथडी भरून वाहत आहेत. २७ आणि २८ जूनच्या नद्यांनी अक्षरश: रौद्ररूप धारण केले. सद्यस्थितीमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.सलग पडणारा पाऊस आणि समुुद्राला येणाºया भरतीमुळे नद्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. पुढील २४ तासांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस असाच मुसळधार कोसळत राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडतील, असा इशाराही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासनाने नदी आणि खाडीकिनारी असलेल्या गावांना, शहरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. प्रचंड पडलेल्या पावासाने अलिबाग, रसायनी, माणगाव, रोहे, महाड, पेण, नागोठणे चांगलेच जलमय झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे.माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाणी शिरल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनालाही सेवा देताना कसरत करावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे दरडी पडल्याने काही कालावधीसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.शनिवारीही पावसाने उसंत न घेतल्याने नागरिकांचे सलग तिसºया दिवशीही प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुढील २४ तासांमध्ये रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये धुंवाधार पाऊस बरसणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पावसाचे रौद्ररूपही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १ जुलै रोजीही तुफान पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे.शेखाडी मार्गावर दरड कोसळलीदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाºयालगत असणाºया दिवेआगर-शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे शनिवारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. याबाबतचे वृत्त २७ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, तरीही प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. शेखाडी मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना नेहमीच सुखकर वाटतो. त्यामुळे या मार्गावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. शुक्रवारपासून पडणाºया पावसामुळे कोंडविल येथे रस्त्यालगत दरड कोसळली. मात्र, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.दरड कोसळण्याची माहिती श्रीवर्धन बांधकाम विभागास मिळाल्यावर शेखाडी रस्त्यावरील दरड हटवण्यात आली आहे. यापुढे विभागाकडून आपत्कालीन दखल घेतली जाईल.- सी. टी. जेट्टे, सा. बां. वि.अधिकारी, श्रीवर्धन.दरवर्षी पावसाळी येथे दरड कोसळल्याने प्रवासी श्रीवर्धनला जाण्यासाठी आमच्या शेखाडी मार्गे मिनीडोअरमध्ये बसत नाहीत, त्यामुळे आमच्या धंद्यावर खूप परिणाम होतो, तरी संबंधित अधिकाºयांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.- प्रवीण पुसाळकर, मिनीडोअर चालक.

टॅग्स :riverनदी