शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चला गाव वाचवू देश घडवू, रायगडमध्ये आदिवासी तरुणांचा ग्रामविकासाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:27 IST

रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे.

- जयंत धुळपरायगड- रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांना अभिप्रेत असलेल्या गावाचा विकास कशा प्रकारे करता येईल, याचा विचार हे आदिवासी तरुण करू लागले असून, त्यांना मार्गदर्शन व सहकार्याची गरज आहे.आदर्श गावाच्या निर्मितीस मोठा हातभारमहात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांची 150 वी जयंती पुढल्या वर्षी साजरी केली जाणार असून, याची तयारी गांधीवादी विचारवंत करू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासी गावात युवा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये येथील आदिवासी युवकांना रोजगार निर्मितीसाठी नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण केला जाईल, याबद्दल येथील तरुणांनीच पुढाकार घेत विविध संकल्पना मांडल्या आहेत. या संकल्पनेतून आदर्श गावाच्या निर्मितीस मोठा हातभार लागू शकतो, असा विश्वास चाफेवाडीतील युवकांना आहे. चाफेवाडी येथील शिबिरासाठी जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते सुभाष पाटील व महाराष्ट प्रदेश सर्वोदय मंडळाच्या पदाधिकारी विमल मुंडे उपस्थित होत्या.ग्रामीण तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिबीररायगड जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांमध्ये जनजागृती करण्याचे काम शिबिरांच्या माध्यमातून रायगड जिल्हा सर्वोदय मंडळ, विनोबा मिशन, ग्रामीण लोकसेवा मंडळ, समता सार्वजनिक वाचनालय, विनोबा मिशन ग्रंथालय यांच्यावतीने केले जात आहे. त्यांच्याच पुढाकाराने चाफेवाडी येथील तरुणांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.-------------------------चाफेवाडीच्या विकासासाठी शिबिरार्थी तरुणांनी केलेले कामांचे नियोजन1.एकनाथ खंडवी, रंजना खंडवी - गावात सर्वोदय साहित्याचे ग्रंथालय सुरू करणार.2.योगेश खंडवी, रंजना खंडवी - लहान मुले व महिलांसाठी काम करणार.3.रविंद्र सांबरी, चंद्रकांत खंडवी- पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोपालन, पर्यटन विषयक काम करणार.4.राजेश ठोंबरे, सविता खंडवी - स्वच्छता, योग-प्राणायम, निसर्गोपचार, वनौषधी उद्यान प्रकल्प.---------------------------150 गांधी अभियानअंतर्गत राबविल्या जात असलेल्या युवा शिबिराचे घोषवाक्यच गाव वाचवू देश घडवू हे आहे. या उपक्रमास चाफेवाडी येथील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या उत्साहाला मदतीची गरज आहे. येथील युवकांच्या नवनवीन संकल्पनेतून आदर्श ग्राम व्यवस्था साकारू शकते. -सुभाष पाटील, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते