शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वारेतील विकासवाडी शाळेच्या इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:10 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथील विकासवाडी रायगड जिल्हा परिषद शाळेच्या छताला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ, तसेच पालकांकडून होत आहे.वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी रस्त्यावर असलेली विकासवाडी व ओलाचीवाडी या सुमारे ४० घरांची व २२५ लोकवस्ती असलेल्या आदिवासी वाड्या, तेथील मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी शासनाने सात वर्षांपूर्वी सुमारे ८ लाख रु पये खर्चून शाळेची इमारत बांधण्यात आली.इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेली ही शाळा २०११ मध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. शाळेचे बांधकाम संपूर्ण आरसीसी असून, दोन वर्गखोल्यांची ही इमारत आहे. परंतु दोन वर्षांपासून पावसाळी दिवसात शाळेचे छत पूर्ण गळत असून, वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्याच शाळेतही एका कोपऱ्यात विद्यार्थ्यांना बसून अध्ययन करावे लागत आहे.इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पावसाळ्यात छत गळत आहे. त्यामुळे इमारतीच्या भिंतीत पावसाळ्यात सतत पाणी मुरत असल्याने त्या कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तेथील शिक्षकांनी इमारतीच्या छतावर प्लॅस्टिकची ताडपत्री टाकली आहे, परंतु तो उपाय ही कुचकामी ठरत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यास पर्यायी व्यवस्थाही नसल्याने इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.आम्ही शाळा दुरु स्तीसाठी ग्रामपंचायतीकडे सतत दोन वर्षे मागणी करत आहोत. शाळेच्या भिंतींना ओल आल्याने त्या कमकुवत झाल्या आहेत. त्या कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.- सुकºया मुकणे, ग्रामस्थ विकासवाडीदोन वर्षांपासून ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे लेखी पत्र देऊन शाळेच्या सद्यस्थितीची माहिती दिली आहे. लवकरच शाळेची डागडुजी करण्यात येईल.- पल्लवी म्हसे, शिक्षिका,रा. जि. प. शाळा विकासवाडी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीRaigadरायगड