शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

शोषितांना न्याय मिळवून देणाऱ्या कायदेतज्ज्ञ; ॲड. सुरेखा दळवी यांचा संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 08:22 IST

- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : शेतकरी, कष्टकरी, कातकरी आणि आदिवासी हा घटक केंद्रस्थानी ठेवून ॲड. सुरेखा ...

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शेतकरी, कष्टकरी, कातकरी आणि आदिवासी हा घटक केंद्रस्थानी ठेवून ॲड. सुरेखा दळवी यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. श्रमिक क्रांती संघटनेच्या माध्यमातून समाज कार्याचा वसा सुरू ठेवला. संघटना व सामाजिक कामाची गरज म्हणून १९८३ साली वकिलीची सनद घेऊन पनवेलच्या कोर्टात वकिली सुरू केली. वकिलीचा उपयोग मुख्यत: आदिवासी, शेतकरी, ग्रामीण, गरीब, कष्टकरी व स्त्रियांचे हक्क संरक्षणासाठी दळवी यांनी केला. आधुनिक काळातील नवदुर्गेच्या रूपाने दळवींनी असंख्य शोषितांना न्याय मिळवून दिला.

सुरेखा दळवी यांचा जन्म आणि शिक्षण मुंबई उपनगरात झाले. माहेर व सासर दोन्ही राष्ट्र सेवादल व समाजवादी चळवळीशी जोडलेले. हाच वारसा त्यांनी चालू ठेवला. आणीबाणीनंतर १९८७ साली तेव्हाच्या कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेरअली केंद्राशी जोडून राष्ट्र सेवा दलाच्या विद्यार्थी विभागाने सुरू केलेल्या आदिवासींच्या अनौपचारिक शिक्षण व आरोग्याशी संबंधित कामात सहभागी होऊन १९८७ ते १९९० या तीन वर्षांत पनवेल, पेण व उरण या तालुक्यांत आदिवासी वस्त्यांतून फिरताना जाणवलेले शोषण, अन्याय, अत्याचाराला तोंड देण्यासाठी १९९३ साली ‘ श्रमिक क्रांती संघटना’ स्थापन केली. सध्या संघटनेचे काम रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर, सुधागड, रोहा व अलिबाग या सात तालुक्यांत आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास ४०० हून अधिक वाड्या-वस्त्यांतील कष्टकऱ्यांत आहे. संघटनेचे ९ पूर्णवेळ स्थानिक कार्यकर्ते आहेत. कामाचे स्वरूप मुख्यतः प्रबोधन, प्रशिक्षण, संघटन, संघर्ष, रचना आणि अभ्यास संशोधन अशा विविध पातळ्यांवर सुरू आहे. राज्य व देश पातळीवरील समविचारी आघाड्या यांच्याशी जोडून संघटना नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत आणि विवेकी वापरावर भर देत आहेत.  

२५ वर्षांचा लढाn आदिवासी कुटुंबे स्थिर व्हावीत म्हणून त्यांचे वन जमिनीवरील विशेषत: जमिनीवरचे हक्क मिळावेत म्हणून २५ वर्षे चिकाटीने लढा देऊन जवळपास १५ हजार एकर जमीन मुख्यत: आदिवासी कुटुंबांना मिळवून देण्याचे काम सुरू आहे. यासह आदिवासींवरील अन्यायाला दळवी यांनी वाचा फोडली. n यामध्ये आदिवासी, अल्प भूधारकांच्या जमिनींवर उभारण्यात येणाऱ्या महलमीरा व रामेश्वर वैभव हिल्स स्टेशन्स विरोधी लढा, रायगड जिल्ह्यातील ‘महामुंबई सेझ’विरोधी लढ्यातील सहभाग, आदिवासींचे स्थलांतर थांबावे म्हणून त्यांच्या जमिनीत फळझाडे व भाजीपाला लागवड करणारे गट तयार करणे, युवकांना जमीन मोजणी, बाळगंगा धरण प्रकल्प भ्रष्टाचार उघडकीस आणणे अशी असंख्य कामे आजघडीला त्या करीत आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्री