शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ, माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:30 IST

प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते.

विशेष प्रतिनिधी / लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आणि नागरिकांनी हे स्वत:चे कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.भारताचे माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांच्या विशेष उपस्थितीत, रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-२०१७ संकलन शुभारंभ कार्यक्रम शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाला. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, अलिबाग तहसीलदार प्रकाश सपकाळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, राज्य मार्ग परिवहन महामंडळ पेण विभाग नियंत्रक विजय नवनाथ गिते, तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि माजी सैनिक आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांचे स्वागत केले.गतवर्षभरात जिल्ह्यातील ५५६ लाभार्थींना निधीवाटपरायगड जिल्ह्याकरिता ध्वजदिन निधी -२०१७ संकलनाकरिता ६० लाख ९८ हजार ४०० रु पयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच या संकलित ध्वजदिन निधीमधून युद्ध विधवा, अपंग सैनिक, आजी-माजी सैनिक व त्यांच्या विधवांना तसेच अवलंबितांना सैनिक कल्याण विभाग व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र. जाधव यांनी सांगितले. सन २०१७-१७ या वर्षात जिल्ह्याच्या कल्याणकारी निधीमधून, वैद्यकीय, शैक्षणिक, चरितार्थ, अंत्यविधी, मुलीचे लग्न या कारणांस्तव जिल्ह्यातील ३२६ लाभार्थींना एकूण १६ लाख ९० हजार १२२ रु पये, तसेच दुसºया महायुद्धामधील २३० लाभार्थ्यांना प्रतिमाह तीन हजार रु पये याप्रमाणे एकूण ८३ लाख २४ हजार रु पये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड