शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोटबेवाडी आदिवासीवाडीजवळ भूस्खलन; ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:41 IST

तहसीलदारांनी केली पाहणी : भूकंपाचे धक्के बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे

पाली : सुधागड तालुक्यातील ताडगाव येथील कोटबेवाडी आदिवासीवाडीजवळ रविवार, ४ आॅगस्टच्या पहाटे ३ च्या सुमारास मोठे भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खचून जमिनीला लांब व रुंद भेगा आणि खड्डे पडले आहेत. या वेळी परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंगळवारी पाली-सुधागड तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे.सध्याच्या अतिवृष्टीमुळे कोटबेवाडी आदिवासीवाडीपासून १०० कि.मी.च्या अंतरावर उत्तरेकडे माळरान जमीन दबल्यामुळे जमिनीच्या उताराच्या ठिकाणी सुमारे ९० मीटर लांब, तर दुसरी ४० मीटर लांब, १५ मीटर रुंदीची व दहा मीटर खोल भेग व इतरही अनेक छोट्या-मोठ्या भेगा आणि खड्डे पडले आहेत. या वेळी वृक्षही उन्मळून पडले आहेत, असा मोठा प्रकार घडल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना असावी.या घटनेमुळे ताडगाव ग्रामस्थ व आदिवासीवाडीतील लोक भयभीत झाले आहेत. ताडगाव, कोटबेवाडी येथील ग्रामस्थ आणि मोहावाडीतील तरुणांनी रात्री जमीन हादरल्यासारखी झाली व आवाज आला असे सांगितले. काहींना हा भूकंप झाल्याचे वाटत आहे. तहसीलदार दिलीप रायन्नावार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच छब्या जाधव यांच्यासह केतन साठे, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश साठे आदीनी घटनास्थळी भेट दिली.तहसीलदारांचा अहवालसध्याच्या अतिवृष्टीमुळे सुधागड तालुक्यातील करंजाई (चिखलगाव), पेंढारमाळ (घोटवडे), हरनेरी, चेरफळवाडी (उद्धर), ढोकळेवाडी (खंडपोली) आणि भालगुल या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे तालुक्यातील जमिनीचे सखोल सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून व्हावे, अशी मागणी तहसीलदारांनी अहवालात केली.त्या रात्री एकदम वेगळा आवाज झाला. जमीन व घर हादरल्यासारखी झाली. घरातील मंडळी झोपेतून उठून बसली. काय झाले कळायला मार्ग नव्हता. वीज पडली असावी, असे वाटले आणि एवढ्या रात्री कोणाला उठवणार त्यामुळे उजाडल्यावर पाहण्यास गेलो. या घटनेने लोक खूप घाबरले आहेत.- प्रकाश साठे, ग्रामस्थ, ताडगावशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. तसेच येथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे पुनर्वसनही केले पाहिजे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी ताबडतोब दखल घेत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना योग्य सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार.- राकेश साठे, तंटामुक्ती अध्यक्ष, ताडगावया लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, सध्या तरी स्थलांतर करण्याची आवश्यकता वाटत नाही. दरड कोसळण्याच्या घटना पाहता तालुक्यातील जमिनीचे सखोल सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून व्हावे, ताडगावचे सर्वेक्षण तत्काळ व्हावे, अशी मागणी केली आहे.- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली