शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेवस पोर्टची जमीन अद्याप पडीक

By admin | Updated: October 30, 2016 02:28 IST

रेवस पोर्ट या खासगी बंदर प्रकल्पाकरीता शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात आल्या. परंतु गेल्या सहा ते सात वर्षांत कोेणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही.

- जयंत धुळप, अलिबागरेवस पोर्ट या खासगी बंदर प्रकल्पाकरीता शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात आल्या. परंतु गेल्या सहा ते सात वर्षांत कोेणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिकांच्या जमिनी गेल्या मात्र त्यांना रोजगार मिळाला नाही. पोर्टसाठी घेतलेल्या शेत जमिनी पडीक ठेवल्याने नापिका झाल्या आहेत. त्या कायद्या नुसारच शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या मागणीकरीता अलिबाग तालुक्यांतील खारेपाटातील आठ गावांतील शेतकरी संघटीत झाले असल्याची माहिती खारेपाट विभाग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.रेवस पोर्ट या खासगी बंदर प्रकल्पाकरीता राज्याच्या विकास आयुक्तांच्या आदेशान्वये अलिबाग तालुक्यातील रांजणखार-डावली, मिळकतखार, कावाडे, बेलपाडा, हाशिवरे, बहिरीचा पाडा, रामकोठा, सोनकोठा या गावातील सुमारे ४०० शेतकऱ्यांच्या जमिनी मल्टी प्रॉडक्ट विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी २००७ ते २०१० या कालावधीत खरेदी करण्यात आल्या. परंतु. या जमीनींवर आजतागायत प्रकल्प झाला नाही.प्रकल्पाकरीता न वापरलेल्या जमीनी परत मिळाव्या या मागणी करीता शेतकऱ्यांच्या वतीने चंद्रकांत वासुदेव पाटील यांनी राज्याच्या महसुल मंत्र्यांकडे १२ जानेवारी २०१६ रोजी अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुशंगाने चौकशी करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश अलिबागच्या तहसिलदारांना देण्यात आले होेते. सारळ मंडळ अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करुन तहसिलदारांना अहवाल सादर केला आहे. रेवस पोर्ट लि. कंपनीने राज्याच्या विकास आयुक्तांच्या ४ डिसेंबर २००७ च्या आदेशान्वये रायगड जिल्हयातील अलिबाग तालुकयातील रांजणखार डावली, मिळकतखार, कावाडे, बेलपाडा, हाशिवरे, बहिरीचा पाडा, रामकोठा, सोनकोठा येथील जमिनी मल्टी प्रॉडक्ट विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुषंगाने कंपनीने २००७ ते २०१० या कालावधीत या क्षेत्रातील जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र खरेदी केलेल्या जमिनीचा वापर त्याच प्रयोजनासाठी अद्यापही सुरू केलेला नाही, असे या शासकीय अहवालात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.कायद्यानुसार जमीन खरेदीपासून पाच वर्षाच्या कालावधीत त्या जमिनीचा औद्योगिक वापर करण्यात येईल आणि तसे न केल्यास ज्या व्यक्तिकडून जमीन खरेदी केली होती त्या व्यक्तिला मूळात ती जमिन तीने जितक्या किंमतीला विकत घेतली होती तितक्याच किंमतीला ती पुन्हा खरेदी करण्याचा हक्क असेल, असेही म्हटले आहे. शेतकऱ्यांना जमीन परत मिळण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु व्हावी, या करिता शासनाचे अंतिम आदेश प्राप्त करुन घेण्याकरीता शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय चर्चेकरीता वेळ मागण्यात आल्याचे पाटील यांनी अखेरीस सांगितले.मे. रेवस पोर्ट लि. या कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी वर्ग-१ व वर्ग-२ या स्वरूपाच्या असून कंपनीने सदर जमिनीमध्ये अद्याप वापर सुरू केलेला नाही. या जागेचा औद्योगिक प्रयोजनासाठी वापर सुरू करणे आवश्यक आहे अन्यथा जमीन ज्याच्याकडून खरेदी करण्यात आली होती, त्या व्यक्तीस विक्रीच्या मूळ किंमतीवर जमिन पुन्हा खरेदी करण्यास हक्क आहे. ही जमीन मूळ मालकालाच विकणे बंधकारक आहे. पडीक जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.