शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खार जमीन संशोधन केंद्रासाठी गिरणे गावात जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:41 IST

Raigad News : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या महत्त्वाच्या बाबीसाठी सतत पाठपुरावा केला होता.

अलिबाग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या पारगाव प्रक्षेत्राच्या जमिनीच्या मोबदल्यात तळा तालुक्यातील गिरणे गावातील ४७ हेक्टर जमीन देण्‍याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जमीन हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या महत्त्वाच्या बाबीसाठी सतत पाठपुरावा केला होता. खार जमीन संशोधन केंद्र पनवेल हे खार जमिनीवर संशोधन करणारे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र आहे. समुद्रालगतच्या खारवट जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि क्षार प्रतीकारक भात जातीच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत या कृषी संशोधन केंद्राची स्थापना सन १९४३ मध्ये करण्यात आली. सन १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. हे संशोधन केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत विद्यापीठाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे.संशोधन केंद्राच्या अधिपत्याखाली पनवेल येथे १२.८० हेक्टर तसेच पारगाव येथे २०.२४ हेक्टर असे एकूण ३३.०४ हेक्टर क्षेत्र होते. दरम्यान पारगाव क्षेत्रातील २०.२४ क्षेत्र हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सिडकोने संपादित केले. पारगाव प्रक्षेत्राच्या जमिनीच्या मोबदल्यात खार जमीन संशोधन केंद्रास पर्यायी खार जमीन देण्याचे सिडकोने आश्वासित केले होते.खाडीलगत शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रामार्फत विविध शिफारशी तंत्रज्ञान तसेच क्षार प्रतीकारक भात जातींची निर्मिती व बीजोत्पादन केलेले आहे. यामध्ये खार जमीन संरक्षणासाठी बाह्यकाठ बांधणी, पाणी निचरा व्यवस्थापन, सुधारित भात लागवड पद्धती जमिनी आहेत. पारगाव व पनवेल केंद्रावर राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशन एसटीआर-एस प्रकल्प आदी प्रकल्प राबवले आहेत. संशोधनात्मक प्रकल्प राबविण्याकरिता पनवेल परिक्षेत्राची जागा अपुरी  पारगाव प्रक्षेत्राच्या कार्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. क्षार प्रतीकारक भात जाती निर्माण करण्याबाबत संशोधन व क्षार प्रतीकारक भात जातींचे बीजोत्पादन विविध संशोधनात्मक प्रकल्प राबविण्याकरिता पनवेल परिक्षेत्राची जागा अपुरी पडत होती. संशोधन कार्य चालू ठेवण्यासाठी तसेच तंत्रज्ञान त्या अनुषंगाने रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे  तळा तालुक्यातील तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलगुरू,  संशोधन संचालक खारजमीन शास्रज्ञ व इतर अधिकारी यांची ६ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील तळा तालुक्यातील गिरणे येथील ४७.७० हेक्टर सरकारी जमिनीची पाहणी केली. ही जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असून, या क्षेत्रावर खारजमीनसंबंधी संशोधन प्रकल्प  तसेच तंत्रज्ञान पूर्ववत चालू करणे शक्य असल्याने स्पष्ट झाले होते. शासनाने या विषयाची तातडीने दखल घेऊन तळा तालुक्यातील गिरणे गावातील ही जागा  कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांना हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड