पनवेल : साताऱ्यातील माणदेश एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी, रिओ ऑलंपिक स्पर्धेत आपला ठसा उमटविणाऱ्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात तहसीलदार पदाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले आहे. दोन तालुके असलेल्या उपविभागीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करून सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे बाबर यांना उरण तालुक्याच्या प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मेहनतीने या पदापर्यंत आल्याची प्रतिक्रिया बाबर यांनी दिली.
ललिता बाबर पनवेलच्या प्रांताधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:48 IST