शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:14 IST

७ दिवसांत नेमणूक न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा

-कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीत देवपाडा गावात जिल्हा परिषदेची शाळा असून, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दीड वर्षापूर्वी येथील एका शिक्षकाची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने पालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलीआहे.अनेक वेळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही अद्याप शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने पुन्हा एकदा शिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पत्र दिले आहे. सात दिवसांत शिक्षकाची नेमणूक केली नाही तर शाळेला टाळे ठोकू असा इशारा देवपाडा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.देवपाडा येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून येथे सुमारे दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देवपाडा गावासह आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. या शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक आहेत. मुख्याध्यापकांना अतिरिक्त कामे असल्याने त्यांना दररोज शिकवण्यास वेळ नसतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले दिसते. देवपाडा शाळा त्याला अपवाद नाही. देवपाडा या ग्रामीण भागात असलेल्या शाळेत देवपाडा व आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील मुले या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात.शासनाने या शाळेकडे दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पुन्हा एकदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला पत्र देऊन देवपाडा शाळेवर सात दिवसांत शिक्षकाची नेमणूक करावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती शाळेला टाळे ठोकू व जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवूअसा इशारा पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिणारे यांनी दिला आहे.शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात नव्याने रु जू झालेल्या गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.देवपाडा शाळेतील एका शिक्षकाची दीड वर्षापूर्वी बदली करण्यात आली आहे. त्या जागी अद्याप दुसºया शिक्षकाची नियुक्ती करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गतवर्षी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली होती. परंतु अद्याप नेमणूक करण्यात आली नसल्याने पुन्हा एकदा शिक्षकाची मागणी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. सात दिवसांत शिक्षकाची नियुक्ती केली नाही तर शाळेला टाळे ठोकू, असेही कळविले आहे.- लक्ष्मण शिणारे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, देवपाडा

टॅग्स :SchoolशाळाRaigadरायगडStudentविद्यार्थी