शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीअभावी शिवस्मारकाकडे पाठ; ‘जेएनपीए’साठी पांढरा हत्ती, कोट्यवधींचा खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:24 IST

स्मारकाच्या देखभालीवरच जेएनपीएकडून महिन्यासाठी २२ लाख ४०,८९७, तर वर्षाकाठी २ कोटी ६८ लाख ९०,७७० रुपये खर्च होत आहेत. 

मधुकर ठाकूर उरण - राज्यातील लाखो शिवभक्त, दासभक्तांना अभिमान वाटेल असे जासई-उरण येथे ‘जेएनपीए’ने ३२ कोटी खर्चून ऐतिहासिक २० मीटर उंचीचे शिवस्मारक उभारले आहे. मात्र, प्रसार, प्रचार करण्यात जेएनपीए प्रशासन अपयशी ठरल्याने शिवस्मारकाच्या देखभालीवरही कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. या स्मारकाकडे पर्यटकांसह शिवभक्त, दासभक्त फिरकतच नाहीत. वाढत्या खर्चामुळे हे स्मारक ‘जेएनपीए’साठी पांढरा हत्ती ठरू लागले आहे. 

९ हजार चौरस मीटर क्षेत्रात १९.३ मीटर उंचीच्या शिवस्मारकासह संग्रहालयाचीही निर्मितीही केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वस्तूंसह चित्र, शिल्पं लावली आहेत. तळमजल्यावर सभागृह, ग्रीनरूम, संग्रहालय आहे.  दुसऱ्या मजल्यावर एक्झिबिशन हाॅल आहे. तिसऱ्या,चौथ्या मजल्यावर व्ह्यूज गॅलरी, व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था केली आहे. 

१९.३ मीटरचा अष्टधातूंचा पुतळा पाचव्या मजल्यावर ६ मीटर उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंच रामदास स्वामींचा अष्टधातूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. याची तळमजल्यापासून उंची १९.३ मीटर आहे.  शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते.  

महिन्याला २२ लाखांचा खर्च कोरोना काळात दोन वर्षे बंद ठेवलेले शिवस्मारक आता शिवप्रेमी, पर्यटकांसाठी नाममात्र १० रुपये तिकीट दरात खुले केले. मात्र, ते फिरकेनासे झाले आहेत. परंतु, स्मारकाच्या देखभालीवरच जेएनपीएकडून महिन्यासाठी २२ लाख ४०,८९७, तर वर्षाकाठी २ कोटी ६८ लाख ९०,७७० रुपये खर्च होत आहेत. 

शिवस्मारकाची उभारणी आर्थिक फायद्यासाठी केलेली नाही. मात्र प्रसार, प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग, सामाजिक संस्थेची मदत घेऊन पर्यटकांमध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. - मनीषा जाधव, वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव, जेएनपीए