शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत महिलेला भूल देऊन दागिने लंपास; खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:44 IST

येथे रविवारी दुपारी एका महिलेला दोन भामट्यांनी मोगलवाडी मार्गावर गाठून आपल्याला भूक लागल्याचे सांगून काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत भूल देऊन तिच्याकडील दागिने काढून घेऊन भामटे पसार झाले.

खोपोली : येथे रविवारी दुपारी एका महिलेला दोन भामट्यांनी मोगलवाडी मार्गावर गाठून आपल्याला भूक लागल्याचे सांगून काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत भूल देऊन तिच्याकडील दागिने काढून घेऊन भामटे पसार झाले. या घटनेनंतर या महिलेला काही वेळ काहीच कळाले नाही. मात्र, शुद्धीवर आल्यावर आपली फसवणूक करून सोने चोरले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.खोपोली शहरात घरकाम करणारी महिला सुनीता मोरे (रा. वर्धमान नगर) या दैनंदिन घरकामे करून दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घरी जात असताना मोगलवाडी मार्गावरील हायवेच्या कॉर्नरजवळ ही महिला आल्यावर दोन अनोळखी व्यक्तींनी समोर येऊन ताई आम्ही खूप लांबून आलोय, खूप भूक लागली आहे, काहीतरी मदत करा, अशी विनवणी के ली. त्या वेळी सुनीता मोरे यांनी बाजूच्या हॉटेलमध्ये त्यांना वडापाव खायला दिला. या वेळी चर्चा करताना सुनीता मोरे यांना भूल देऊन त्यांच्याकडील रुमाल काढून समोर केले, त्या वेळी सुनीता यांनी त्यांच्या गळ्यातील चेन व कानातले असे एक तोळे सोने त्या रु मालात काढून दिले. या दरम्यान सुनीता यांना आपण काय करतोय हे कळालेच नाही. त्याबदल्यात या भामट्याने सुनीता यांना पैशाची गड्डी म्हणून वरती एक शंभरची नोट व त्याखाली कागदाचे नोटांच्या आकाराचे तुकडे दिले आणि काही कळायच्या आत हे भामटे पसार झाले.या घटनेच्या काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या सुनीता यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली.- ही घटना घडल्यानंतर सर्वत्र या भामट्यांचा शोधण्याचा प्रयत्न सुनीता मारे यांनी केला. मात्र, या दोघा भामट्यांनी त्या ठिकाणाहून पलायन केल्याने सुनीता मोरे यांनी तत्काळ खोपोली पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक केल्याची तक्र ार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी