शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:14 IST

रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

धाटाव : रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाºया मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर रोहा तालुक्यातील कोळी बांधवांनी बुधवारी एकत्र येऊन रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. या धरणे आंदोलनाने मात्र संपूर्ण परिसर दणाणून गेला.बुधवारी १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यावरून शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे, महाराष्ट्र कोळी समाज संघ रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली सबंध तालुक्यातील कोळी समाज बांधवांसह निघालेल्या मोर्चाने रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात रोहा नगरपालिकेच्या नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना महिला तालुका संघटक नीता हजारे, कोळी समाज तालुकाध्यक्ष मनोज भायतांडेल, शिवसेना शहर अध्यक्ष दीपक तेंडुलकर, बुवा साळवी आदींसह खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रोहा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधीक्षक संदीप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यासह अधिकाºयांनी प्रवेशद्वारावर निवेदन स्वीकारले. येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनावर खारापटी, निडी, पडम, लक्ष्मीनगर, नवखार, सोनखार, न्हावे या परिसरातील एकूण १२९ मच्छीमार बांधवांनी सह्या केलेले पत्र निवेदनासमवेत देण्यात आले.प्रजासत्ताकदिनी साखळी उपोषणहे प्रदूषित पाणी साळाव येथे समुद्रात सोडत नाही तोपर्यंत मासेमारी करणाºया कोळी बांधवांना नुकसानभरपाई देण्याचे ठरले असताना रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन यांना वारंवार भेटल्यानंतर मागणी मान्य केली, परंतु नुकसानभरपाई देण्यास आजवर टाळाटाळ करीत आहेत. असोसिएशनच्या अधिकाºयांनी मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे हे धरणे आंदोलन करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.यानंतर येत्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला सकाळी ९ वा. प्रांत कार्यालय रोहा येथे न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणास बसणार अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. हा प्रश्न सुटला नाही तर समाजातील तरु णांनी हा प्रश्न अहिंसेच्या मार्गाने नेला तर त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे पत्र समाज बांधवांनी दिले आहे.

टॅग्स :agitationआंदोलन