शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 

By राजेश भोस्तेकर | Updated: June 8, 2024 06:52 IST

तटकरे यांच्या विजयाचे फलित काय याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांनी उद्धवसेनेच्या अनंत गीते यांचा पराभव करून विजय मिळवला. तटकरे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तटकरे यांच्या विजयाचे फलित काय याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...

लोकसभा विजयाबाबत आपले फलित काय? महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. याबद्दल मी रायगड, रत्नागिरीमधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. 

अजित पवार गटाला राज्यात अपयश का आले? आमच्या पक्षाने राज्यात चार जागांवर निवडणूक लढवली होती. रायगडमध्ये आम्हाला यश मिळाले आहे. तीन ठिकाणी अपयश आले आहे. याबाबत आत्मपरीक्षण करू. 

महायुतीला कोकणात यश मिळाल्याबाबत काय वाटते? महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार आहे. त्यानुसार काम करण्यात येणार आहे. 

महायुतीला देशात चांगले यश मिळाले आहे. त्याबद्दल आपले मत काय? देशभरात काँग्रेसला यावेळी निश्चित यश मिळाले आहे. कारण यावेळी सर्वपक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते. तरी देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरुवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू. आमच्या पक्षाने ४ जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करू.

महाडमधील घटलेल्या मताधिक्याबाबत काय सांगाल? माझ्या विजयासाठी महायुतीतील सर्व आजी-माजी आमदार, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतल्याने माझा विजय सुकर झाला आहे. काही मतदारसंघात मताधिक्य कमी झाले असले तरी तेथील परिस्थिती वेगळी असते.  त्याची कसर विधानसभेत भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेraigad-pcरायगडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४