शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खांडसई, कासारवाडी पाणीदार; लोकसहभागातून बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:12 IST

सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.खांडसई व कासारवाडी गावात वर्षानुवर्षे उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई भेडसावते. यामुळे येथील जलस्रोत टिकवून भूगर्भजल वाढवावे ही कल्पना सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच उमेश यादव यांना सुचली. त्यानुसार त्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मिळून खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर बंधारा बांधला.या कामासाठी स्थानिक आदिवासींनी देखील मौलिक सहकार्य केले. पाणी अडविल्याने गावकºयांचा तसेच गुरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच भूजलभरणा वाढणार आहे. बंधारा बांधते वेळी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सदस्य नथुराम चोरघे, शिपाई गणेश महाले, युवासेना पेण-सुधागड-रोहा विधानसभा समन्वयक आशिष यादव यांच्यासह गणेश सावंत, दीपक जाधव, अनंता साळस्कर, मोहन, किरण, माउली आदींसह ग्रामस्थ तसेच आदिवासीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रत्येकाने मोठ्या मेहनतीने बंधारा बांधण्याचे कामकेले.ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांवरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सहकार्य घेणार आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनाने हा प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो. ग्रामस्थांनी एकत्र येवून केलेल्या या कामाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.- उमेश गोविंद यादव, सरपंच, सिद्धेश्वर

टॅग्स :Waterपाणी