वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ पासून सुरू झाले. नव्याने बनविण्यात आलेला रस्ता व जुन्या रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तसेच गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या पध्दतीने डांबरीकरण न झाल्याने महामार्गावर पावसाच्या दणक्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडायला सुरुवात झाली असून या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गावर पेण ते वडखळ, नागोठणे महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होवून याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच कोकणच्या विकासाला चालना देणारा हा एकमेव रस्ता आहे. या महामार्गाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने या महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने या महामार्गावर दरवर्षी शेकडो प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे केले गेले असल्याने पहिल्या पावसाच्या दणक्याने महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई - गोवा महामार्गावर पेण ते वडखळ, नागोठणे महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. या महामार्गाची दुरु स्ती करावी अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांकडून होत आहे. (वार्ताहर)रस्ता दुरु स्तीची मागणीआता वर्षा सहलीचा प्रारंभ होणार असून या वर्षा सहलीसाठी पर्यटकांची पसंती अलिबाग-मुरुड या ठिकाणांना असल्याने या महामार्गावर वाहतूक वाढणार असल्याने या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू झाल्याने या खड्डेमय रस्त्यांमधून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाची दुरु स्ती करावी अशी मागणी होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे
By admin | Updated: July 5, 2016 02:22 IST