शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काशीद समुद्रकिनारी गर्दी, वाहतुकीवर परिणाम; पर्यटकांची मुरुडला पसंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 01:20 IST

मुरुड व काशीद या ठिकाणी सर्व लॉज व हॉटेल हाउसफुल झाले आहेत

मुरुड :  मुरुड व काशीद समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली असून, जिथे पाहावे, तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत आहेत. शनिवार, रविवार  त्याचप्रमाणे, सोमवारी रजा टाकून मंगळवारची प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक आले आहेत. समुद्रकिनारी वाहनांच्या दाटी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता.

मुरुड व काशीद या ठिकाणी सर्व लॉज व हॉटेल हाउसफुल झाले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी राजपुरी येथेही मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. पर्यटकांची संख्या जास्त झाल्याने जंजिरा किल्ल्यावरील तिकीट घेण्याची वेळही बदलण्यात आली आहे. तिकीट घेतल्याशिवाय जंजिरा किल्ल्यात प्रवेश मिळत नाही. पूर्वीची वेळ सकाळी ९.३० होती, आता सध्या ती सकाळी ८.३०ची करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या सर्व पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहता येत आहे. राजपुरी नवीन जेट्टी येथे शेकडोच्या संख्येने वाहनांची गर्दी तर शिडाच्या बोटीत बसण्यासाठीही पर्यटकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या.  किल्ला पाहण्यासाठीही पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. दिवसागणिक पर्यटकांची गर्दी किल्ल्यावर वाढल्याने वाहन पार्किंगसाठीही जागा कमी पडत आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलधारक व अल्पोहार, हॉटेल यांचा व्यवसाय तेजीत होता.  प्रचंड गर्दीमुळे व मुख्य बाजारातून जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या वाहनांमुळे मोठीच मोठी गर्दी दिसून येत आहे. मुरुड पोलीस ठाण्यामार्फत विविध  ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येऊन वाहतूक व्यवस्था उत्तमपणे हाताळण्यात येत होती. मुरुड शहराच्या  खरेदी मोठी गर्दी दिसून येत होती. यामुळे  वाहतूककोंडी  निर्माण झाली होती. 

टॅग्स :tourismपर्यटन