शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कासाडीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेत सहभाग करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:36 IST

तळोजामधील कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पात्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करून त्यामधील गाळ काढावा व पात्र प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.

- वैभव गायकरपनवेल  - तळोजामधील कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पात्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करून त्यामधील गाळ काढावा व पात्र प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू झाल्यामुळे पनवेलचे नाव देशाच्या नकाशावर झळकू लागले आहे. या परिसरामध्ये गृहनिर्माण व इतर मोठे प्रकल्प सुरू होऊ लागले आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरणाकडे मात्र गंभीर दुर्लक्ष होऊ लागले आहे. विमानतळासाठी उलवे नदीचे पात्र वळविण्यात येत आहे. पनवेलमधील गाढी नदीच्या पात्रामध्येही अतिक्रमण होऊ लागले असून कासाडी नदीलाही प्रदूषणासह डेब्रिजच्या भरावाचा विळखा पडू लागला आहे. तळोजा परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कासाडीमध्ये रासायनिक पाणी सोडले जात आहे. नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी भराव टाकून पात्र अरुंद बनविण्यात येत आहे. ‘लोकमत’ने ४ एप्रिलच्या अंकामध्ये कासाडी नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पर्यावरणप्रेमी,सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे.नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र देऊन कासाडीचा नदी जोड प्रकल्पात समावेश करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन बारणे यांनीही तत्काळ केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांना पत्र देऊन कासाडी नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. नदीमध्ये कारखान्यांमधील दूषित पाणी सोडले जात आहे. यामुळे प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रदूषणामुळे परिसरामधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे कासाडीचा राष्ट्रीय योजनेमध्ये समावेश करून येथील गाळ काढण्यात यावा, नदीपात्राचे सुशोभीकरण करावे व पात्र प्रदूषणमुक्त करण्यात यावे, अशी सूचना केली आहे.खासदारांनी पाठपुरावा सुरू केल्यामुळे कासाडीचे प्रदूषण थांबविण्यासाठी केंद्र शासनाकडून ठोस उपाययोजना होतील अशी अपेक्षा केली जात आहे.पर्यावरण मंत्र्यांना पत्रनगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पत्र दिल्यानंतर खासदार बारणे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. ५ एप्रिलला केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना पत्र दिले आहे. कासाडी ही पनवेल तालुक्यातील महत्त्वाची नदी आहे. कारखान्यांमधील दूषित पाणी पात्रामध्ये सोडले जात आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नदी प्रदूषण व गाळमुक्त करण्यासाठी कासाडीचा तत्काळ राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करावा असे सूचित केले आहे.अरविंद म्हात्रेंचे खासदारांना निवेदन : पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी ४ एप्रिलला खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र देऊन कासाडीचा केंद्रीय योजनेमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक २ मधून वाहणाºया कासाडीचे पात्र प्रदूषित झाले आहे. यामुळे येथील पाण्याचा उपयोग करता येत नाही. नदी प्रदूषणमुक्त करावी, नदीमधील गाळ काढावा व नदीपात्राचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Raigadरायगडpollutionप्रदूषण